तिसऱ्यांदा विवाहाचा प्रयत्न : आईवडील न्यायालयीन कोठडीत
By Admin | Updated: January 26, 2017 03:00 IST2017-01-26T03:00:08+5:302017-01-26T03:00:08+5:30
दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून तिसऱ्यांदा विवाहाचा प्रयत्न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील एका युवकाच्या डॉक्टर वडिलासह

तिसऱ्यांदा विवाहाचा प्रयत्न : आईवडील न्यायालयीन कोठडीत
ठाणे : दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून तिसऱ्यांदा विवाहाचा प्रयत्न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील एका युवकाच्या डॉक्टर वडिलासह त्याच्या आईची रवानगी बुधवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न करणारा भुसावळ तालुक्यातील नीरज सूर्यवंशी हा सध्या कोपरी पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याचे वडील डॉ. सुरेश सूर्यवंशी (६०) आणि
आई मीना सूर्यवंशी (५५) यांना कोपरी पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
ठाण्यातील एका अधिकाऱ्याच्या मुलीसोबत साखरपुडा करून तिसऱ्यांदा विवाह करण्याची तयारी आरोपी नीरजने चालवली होती.
या संबंधासाठी नीरजच्या ज्या-ज्या नातलगांनी मध्यस्थी केली होती, त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. कदम हे करीत आहेत. (प्रतिनिधी)