तृतीयपंथींच्या घरात गणेशोत्सव
By Admin | Updated: September 7, 2016 02:34 IST2016-09-07T02:34:46+5:302016-09-07T02:34:46+5:30
बदलापूरात श्रीदेवी या तृतीयपंथीने आपल्या घरात गणेशोत्सव साजरा केला असून दर्शनासाठी तृतीयपंथीय मित्र परिवार त्याच्या घरी मोठ्या संख्येने हजर होता.

तृतीयपंथींच्या घरात गणेशोत्सव
बदलापूर : बदलापूरात श्रीदेवी या तृतीयपंथीने आपल्या घरात गणेशोत्सव साजरा केला असून दर्शनासाठी तृतीयपंथीय मित्र परिवार त्याच्या घरी मोठ्या संख्येने हजर होता.
यंदाचे हे गणपती बसवण्याचे २० वे वर्ष असून त्यांच्याकडे तृतीयपंथीयांसह आजूबाजूला राहणारे रहिवाशी आणि व्यापारी यांच्यासह मुंबई, ठाणे नवी मुंबईतून अनेकजण दर्शनासाठी मोठ्या संख्याने येतात.
अवघ्या दहा बाय दहा फुटाच्या खोलीत राहणाऱ्या श्रीदेवी या तृतीयपंथीयाकडे गेल्या २० वर्षांपासून गणपती आणला जातो. मुंबई ठाण्यातील बहुतांशी तृतीयपंथीय हे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बदलापूर येथे येतात. घर जरी लहान असले तरी गणपतीला येणाऱ्यांचा पाहुणचार करण्यात कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. गणेशासोबत यल्लमा देवीची पुजा केली जाते. आरतीसाठी आजूबाजूला राहणारी मंडळीही न चुकता हजर असतात. दीड दिवसांच्या गणपती काळात आमच्या बिरादरीतील सगळेजण एकत्र येत एकमेकांना भेटत असल्याने हा उत्सव आमच्यासाठी खूप आनंदाचा असल्याचे श्रीदेवी यांची सहकारी स्वाती यांनी सांगतिले.