महिलांच्या गळ्यातील चैन खेचुन चोरटे पळाले

By सदानंद नाईक | Updated: October 10, 2023 19:25 IST2023-10-10T19:25:47+5:302023-10-10T19:25:55+5:30

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Thieves ran away by pulling the chains around women's necks | महिलांच्या गळ्यातील चैन खेचुन चोरटे पळाले

महिलांच्या गळ्यातील चैन खेचुन चोरटे पळाले

उल्हासनगर: मुलाला सकाळी साडे सहा वाजता स्कुलबस मध्ये सोडून देण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पाठीवर मागून आलेल्या मोटरसायकलस्वारांनी थाप मारून गळ्यातील ८५ हजाराची चेन लंपास केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात राहणाऱ्या महेक अनिल सुबनानी हया ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सहा वाजता मुलाला स्कुलबस मध्ये सोडून देण्यासाठी आल्या होत्या. मुलाला स्कुलबस मध्ये बसून दिल्यावर घरी जात होत्या. त्यावेळी ।लागून आलेल्या अनोळखो मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या पाठीवर जोरात थाप मारून गळ्यातील सोन्याची अड्डीच तोड्याची चेन खेचुन चोरून नेली. महेक यांनी आरडाओरडा करेपर्यंत मोटारसायकलस्वार धूम स्टाईलने पळून गेले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Thieves ran away by pulling the chains around women's necks