शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आग विझवायला गेले; पण पाण्याविना, स्थायी समितीत झाले उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:16 IST

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी महिनाभरापूर्वी आग लागली होती.

ठाणे : महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी महिनाभरापूर्वी आग लागली होती. ती विझवण्यासाठी गेलेल्या टँकरमध्ये पाणीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. परंतु, असे असतानाही अग्निशमन विभागाने तयार केलेल्या अहवालात त्यावेळेस पाइपमध्ये पाणी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.स्थायी समितीची बैठक सुरू होताच म्हस्के यांनी या मुद्याला हात घातला. महिनाभरापूर्वी महापालिकेच्या बाजूला असलेल्या एका कार्यालयात आग लागली होती. त्यावेळेस प्रत्यक्ष ठिकाणी मी हजर होतो, त्यावेळेस अग्निशमन विभागाची एक गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळेस कर्मचारी पहिल्या मजल्यापर्यंत पाइप घेऊन गेले आणि तो सुरूकेला असता त्यात पाणीच नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली, असे म्हस्के म्हणाले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एखाद्या टँकरमध्ये पाणी नाही, याची कल्पना अग्निशमन विभागाला नव्हती का, असा सवालही त्यांनी केला. त्यावेळेस अग्निशमन केंद्र जवळ असल्याने दुसरी गाडी मागवून ती आग विझवण्यात आली. मात्र, एखाद्या लांबच्या ठिकाणी अशी घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोणाला ठरवले असते, असा सवालही त्यांनी यावेळी केला.तसा अहवालच तयार केलेला नाही : काळेविशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने याविषयी जो अहवाल तयार केला आहे, त्यामध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा पाठवलेल्या टँकरमध्ये पाणी होते, असा हवाला दिला आहे. त्यामुळे अग्निशमन विभाग केवळ आपली चूक झाकण्याचा प्रयत्न करीत असून ज्या कोणी अधिकाºयाने ती केली, त्याच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली. परंतु, तसा अहवाल तयार केला नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली. तसेच ज्या वेळेस ही घटना घडली, त्यावेळेस पहिल्या टँकरमध्ये पाणी नसल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढला. अखेर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनीया प्रकरणाची चौकशी करून दोषींवरकारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्याने या वादावर पडदा पडला.

टॅग्स :thaneठाणेfireआग