शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात आचारसंहितेचे तीन तेरा, राजकीय बॅनर्स जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:53 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत.

अंबरनाथ  - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत. काही ठिकाणी नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर, तर काही ठिकाणी कोकण म्हाडा महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे बॅनर्स काढण्यासाठी आचारसंहिता पथक पोहोचलेलेच नाही. त्यामुळे आचारसंहिता पथक नेमके करतेय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आचारसंहिता लागू झाल्यावर बदलापूर शहरातील बॅनर काढण्यात आले आहेत; मात्र ग्रामीण भागात पालन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. आचारसंहिता लागून आठवडा उलटलेला असतानाही ग्रामीण भागात पुढाऱ्यांचे बॅनर्स झळकत आहेत. ग्रामीण भागातील होर्डींगवर आचारसंहिता पथकाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. बदलापूर खरवई गाव सोडल्यावर चामटोलीपासून ग्रामीण भागाला सुरुवात होते. चामटोली ते वांगणी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे बॅनर झळकत आहेत. बदलापूर-कर्जत रस्त्यावर खाजगी जागेत मोठमोठे होर्डींग उभे करण्यात आले आहेत. त्यावरही कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच या भागात कोणताही पुढारी, वाटेल त्या ठिकाणी बॅनरबाजी करीत आहे. निवडणूक काळातही हीच परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुखांचा वाढदिवस होऊन १० दिवस उलटले असतानाही त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर अजुनही दिसत आहेत. गोरेगांव-वांगणी या भागात गोपाळ लांडगे यांची कोकण म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठीदेखील बॅनर लावण्यात आले आहेत.आचारसंहिता काळात बॅनर लावताना त्याची परवानगी घेणे आणि परवानगीचा क्रमांक बॅनरवर टाकणे बंधनकारक आहे; मात्र एकाही बॅनरची परवानगी घेतलेली दिसत नाही.आचारसंहितेच्या काळात राजकीय पुढाऱ्यांचा हा अतिउत्साहीपणा रोखण्याचे काम आचारसंहिता पथकाच्या प्रमुखाने करणे गरजेचे आहे; मात्र आचारसंहिता प्रमुख ग्रामीण भागात जातच नसल्याचे दिसत आहे.कार्यालयात बसून कामकाज सुरु असल्याने शहराबाहेर नेमके काय सुरु आहे, याची कल्पना कोणालाच नाही. आचारसंहिता काळात पक्षाचे झेंडे काढणे गरजेचे आहे; मात्र तेदेखील तसेच ठेवण्यात आले आहेत.महामार्गावर ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची कल्पना न केलेलीच बरी. ग्रामीण भागात मिळेल तिथे बॅनर लावले जात असून, आचारसंहितेला कुणीच जुमानत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे