बुधवारी ठाण्यात पाणी नाही

By Admin | Updated: November 24, 2015 01:49 IST2015-11-24T01:49:16+5:302015-11-24T01:49:16+5:30

भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३० टक्के पाणीकपात करण्याचे ठरविले असल्याने ठाणे महापालिकेची स्वत:ची

There is no water in Thane on Wednesday | बुधवारी ठाण्यात पाणी नाही

बुधवारी ठाण्यात पाणी नाही

ठाणे : भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३० टक्के पाणीकपात करण्याचे ठरविले असल्याने ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना व स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरु वारी सकाळी ९ पर्यंत बंद राहणार आहे.
या कालावधीत घोडबंदर रोड, पाचपाखाडी, ऋतु पार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, बॉम्बे कॉलनी, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार असून नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: There is no water in Thane on Wednesday