ठाणे : उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी पाणीकपात केल्याने स्टेमकडून ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरु वार सकाळी ९ पर्यंत बंद राहणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्यांची विविध ठिकाणी दुरु स्तीची व पंपिंग स्टेशनमधील दुरु स्तीची कामे करण्यात येणार असल्यानेही शहराचा पाणीपुरवठा याच कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार, या शटडाउनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार आहे.
ठाण्यात आज पाणी नाही
By admin | Updated: December 28, 2016 04:12 IST