ठाण्यात आज पाणी नाही
By Admin | Updated: December 28, 2016 04:12 IST2016-12-28T04:12:45+5:302016-12-28T04:12:45+5:30
उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी पाणीकपात केल्याने स्टेमकडून ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा

ठाण्यात आज पाणी नाही
ठाणे : उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी पाणीकपात केल्याने स्टेमकडून ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरु वार सकाळी ९ पर्यंत बंद राहणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्यांची विविध ठिकाणी दुरु स्तीची व पंपिंग स्टेशनमधील दुरु स्तीची कामे करण्यात येणार असल्यानेही शहराचा पाणीपुरवठा याच कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार, या शटडाउनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार आहे.