ठाण्यात आज पाणी नाही
By Admin | Updated: October 2, 2015 11:23 IST2015-10-01T23:42:15+5:302015-10-02T11:23:07+5:30
जय भवानीनगर पंपहाऊस येथे अत्यावश्यक दुरु स्तीचे काम करण्यात येणार असल्याने येत्या शुक्रवारी २ आॅक्टोबरला सकाळी ९ ते शनिवारी ३ आॅक्टोबर २०१५ रोजी सकाळी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे

ठाण्यात आज पाणी नाही
ठाणे : जय भवानीनगर पंपहाऊस येथे अत्यावश्यक दुरु स्तीचे काम करण्यात येणार असल्याने येत्या शुक्रवारी २ आॅक्टोबरला सकाळी ९ ते शनिवारी ३ आॅक्टोबर २०१५ रोजी सकाळी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, सावरकरनगर, रामनगर, रूपादेवीपाडा, किसननगर, टेकडी बंगला या परिसरांचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. तसेच या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येणार असल्याने नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठामपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)