शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मदरशांमध्ये सर्वेक्षणच नाही

By admin | Updated: July 8, 2015 22:12 IST

सहा ते १४ वयोगटातील शाळेपासून दुरावलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यसरकारने शनिवारी विशेष मोहीमेतील सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली आहे.

ठाणे : सहा ते १४ वयोगटातील शाळेपासून दुरावलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यसरकारने शनिवारी विशेष मोहीमेतील सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली आहे. मात्र, त्यात मुंब्रा, राबोडी या मुस्लीम बहुल परिसरातील मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण न केल्याने आता या सर्वेक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मदरशांत जाणारी मुले शाळाबाह्य ठरवली जातील, असे स्पष्ट करून राज्यात शनिवारी सर्वेक्षण करण्यात आले होते. कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क असून शाळेपासून वंचित बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शनिवारी ठाणे शहरात ४ हजार २५० शिक्षक आणि ५० स्वयंसेवकांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले. ठाणे शहरात कधीच शाळेत न गेलेल्या मुलांची संख्या ८८० आहे. तर मध्येच शाळा सोडलेल्या मुलांची संख्या ११५४ इतकी आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर सर्वेक्षणात पाच हजार ४२३ मुले शाळाबाह्यआहेत. विशेष म्हणजे, शहरी भागातील मुलांची संख्या ग्रामीण भागापेक्षा अधिक आहे. राज्य शासनाने मदरशांमध्ये देण्यात येणारे शिक्षण हे शिक्षण पद्धतीला अनकुल नसल्यामुळे येथे जाणारी मुले ही शिक्षणबाह्य समजली जातील, असे सर्वेक्षणापूर्वी स्पष्ट केले होते. त्या निर्णयाला अनुसरून मुंब्रा आणि राबोडी या मुस्लीम बहुल परिसरात मदरशांमधून शिक्षण घेणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण होणे अभिप्रेत असताना शनिवारी पार पडलेल्या सर्वेक्षणांतर्गत ते होऊ शकले नाही. मुंब्य्रामध्ये नुकतेच राष्ट्रवादीतर्फेया प्रश्नावर राज्य सरकारच्या निर्णया विरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे या परिसरात जाऊन कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणच केले नाही. मुंब्रा व राबोडी परिसर वगळून उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या ठिकाणाचा सर्वेक्षण कार्यक्र म लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)