ठाण्यात आता टॉप-२० गुंडांचीही यादी तयार
By Admin | Updated: March 1, 2016 02:28 IST2016-03-01T02:28:58+5:302016-03-01T02:28:58+5:30
शहरात शांतता राखण्यासाठी शहर पोलिसांनी नवा फंडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या स्थानिक गुंडांची टॉप-२० यादी तयार करण्याचे

ठाण्यात आता टॉप-२० गुंडांचीही यादी तयार
पंकज रोडेकर, ठाणे
शहरात शांतता राखण्यासाठी शहर पोलिसांनी नवा फंडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या स्थानिक गुंडांची टॉप-२० यादी तयार करण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर यादीचे काम सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे गुंडांची यादी करणारे शहर पोलीस दल हे जिल्ह्यातील बहुधा पहिलेच दल ठरणार आहे.
मध्यंतरीच्या काळात मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या शहरांत धूम स्टाइलने सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे महिलांमध्ये त्यांची दहशत पसरली होती. याचदरम्यान, त्या चोरट्यांवर वचक बसवण्यासाठी शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांची टॉप-२० यादी तयार केली. त्यानुसार, या चोरट्यांविरोधात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कारवाई हाती घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे आयुक्तालयात सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे ठाणेकरांना कळतनकळत होणारा त्रास किंवा भविष्यात अशा प्रकारच्या घटनांत वाढ होऊ नये तसेच अशा प्रकारच्या लोकांमुळे शांतता भंग होऊ नये आणि त्यांच्यावर वेळीच अंकुश ठेवण्यासाठी त्या गुंडांची यादी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तालयात शांतता राखण्यासाठी स्थानिक पोलीस ही यादी तयार करण्यास लागल्याचे सूत्रांनी सांगितले