शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
3
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
4
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
5
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
6
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
7
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
8
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
9
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
10
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
11
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
12
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
13
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
14
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
15
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
16
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
17
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
18
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
19
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
20
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

दिल्या-घेतल्या पाण्याचा हिशेब नसल्याने ठणठणाट

By संदीप प्रधान | Updated: November 7, 2022 06:43 IST

मुंबईतील दीड कोटीहून अधिक लोकसंख्येची तहान ठाणे जिल्हा भागवतो.

मुंबई शहराची तहान भागवणारी धरणे ठाणे जिल्ह्यात आहेत. यंदा पाऊसही मुबलक झाला आहे; परंतु जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील काही भागांत भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनधिकृत बांधकामांना दिले जाणारे बेकायदा कनेक्शन, टँकर माफियांकडून होणारी पाणीचोरी आणि दिल्या- घेतल्या पाण्याचा हिशेब ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नसणे, यामुळे जिल्ह्यातील शहरे तहानलेली आहेत.

मुंबईतील दीड कोटीहून अधिक लोकसंख्येची तहान ठाणे जिल्हा भागवतो. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात आहेत; परंतु शहापूर व मुरबाड या ग्रामीण भागातील १६७ गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण भागात ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ हे चित्र आहे. याखेरीज ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, उल्हासनगर, मीरारोड- भाईंदर, अशा सर्वच शहरांत पाणीटंचाई जाणवते. ठाण्यातील घोडबंदर, कळवा, वागळे इस्टेट, दिवा या भागांतील अनेक टॉवर, चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये वर्षभर पाणीटंचाई जाणवते. घोडबंदर रोड येथे मोठमोठे टॉवर उभे राहिले. तेथील फ्लॅटची ८० ते ९० लाखांना विक्री केली गेली; परंतु तेथे राहायला येणाऱ्यांना दररोज दोन ते तीन टँकर मागवावे लागतात. एका टँकरचे तीन ते सात हजार रुपये मोजावे लागतात. याचा अर्थ वर्षानुवर्षे येथील रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. कोपरी परिसरात आता मुंबई महापालिकेने अतिरिक्त पाणीपुरवठा केल्याने परिस्थिती सुधारली. घोडबंदरच्या रहिवाशांना भातसा धरणातून अतिरिक्त ५० द.ल.लि. पाण्याची प्रतीक्षा आहे. सोसायट्यांंमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर बसले. ठाणे शहराला ४८५ द.ल.लि. पाणीपुरवठा होत असून, तूर्त मागणी ५३० द.ल.लि.ची आहे. अर्थात, सध्या पुरवठा होत असलेल्या पाण्यातील तब्बल ४२ टक्के पाणीचोरी, गळती यामध्ये वाया जाते.

कल्याण-डोंबिवलीतही...    कल्याण- डोंबिवलीतही वेगळे चित्र नाही. आतापर्यंत महापालिका हद्दीत असलेल्या २७ गावांच्या परिसरात भीषण टंचाई आहे.     भोपर, संदप, दावडी, सोनारपाडा आदी भागांत लोकांना पुरेसा पाणीपुरवठा वर्षभर होत नाही. या दोन्ही शहरांत मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली. त्यांना पाणी दिले जात असल्याने ग्रामीण भागात पाणीपुरवठा कमी झाल्याची ओरड होते.     २७ गावांतील पाण्याची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच आहे. या भागात ३० द.ल.लि. पाणी दिले जाते. ५५ द.ल.लि. पाण्याची मागणी आहे.    सध्या या दोन्ही शहरांना ३८० द.ल.लि. पाणीपुरवठा केला जातो. या शहरांची मागणी ४२३ द.ल.लि.ची आहे. अनधिकृत बांधकामांची पाणीचोरी व गळती यामुळे २१ टक्के पाणी वाया जाते.

टॅग्स :thaneठाणे