शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन बायकांच्या दादल्याने ‘तिसरी’साठी केले मुलाचे अपहरण; पोलिसांनी लढवली शक्कल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 12:00 IST

बारा तासांत पोलिसांनी लावला छडा; दोघांनी गायलेली गाणी यू-ट्युबवर केली अपलोड

तलासरी : आधीच दोन बायकांचा दादला असलेल्याने तिसऱ्या प्रेयसीने आपल्याकडे यावे यासाठी तिच्या बहिणीच्या आठ वर्षांच्या मुलाचे शाळेतून अपहरण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याने मुलाचे अपहरण केले. तलासरी पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवून बारा तासांच्या आत आरोपीला अटक करून अपहृत बालकाची सुटका करून  त्याला आईच्या ताब्यात दिले.

दोन बायका असलेला विवाहित तरुण  राजेश बारक्या धोदडे (रा. वेलूगाव, दादरा नगर हवेली, सध्या रा. कवाडा, ठाकरपाडा)  याचे आणवीर येथील आणखी एका तरुणीशी सूत जुळले. चार वर्षांपासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू असून, त्यांनी यू-ट्यूबवर देखील गाणी गाऊन अपलोड केली आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रेमिका सरिताने  लग्नाचा हट्ट धरल्याने त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे सरिताने त्याच्याकडे पैशांची भरपाई मागितली.   

याचा राग मनात धरून  राजेशने सरिताची बहीण अनिता हिचा मुलगा कमलेश (वय ८ वर्षे) हा सोमवारी सकाळी जिल्हा परिषद शाळा आणवीर, रायातपाडा येथील शाळेत गेला असताना आरोपीने शाळेत जाऊन तुला मावशी सरिताने बोलाविले आहे, असे सांगून त्याला गाडीतून पळवून नेले. त्याने त्याला दादरा नगर हवेलीतील शेलटी  गावातील जंगलात लपवून ठेवले व प्रेयसीला फोन करून तू मला भेटलीस तर मुलाला सोडून देईन, असे सांगून तिला एकटीच मनोर येथे येण्यास सांगितले. 

दबा धरून केले जेरबंद

आरोपी राजेश हा फोन करताना प्रत्येक वेळी मोबाइलचे सीम बदलत होता. लोकेशननुसार आरोपीची गाडी पोलिसांच्या खासगी गाडीच्या मागेच असल्याने सावज पकडण्यासाठी तरुणीला चारोटीजवळ महामार्गांवर सोडले व पोलिस दबा धरून बसले. यावेळी राजेशने प्रेयसीला बघून गाडी थांबवून तिला गाडीत ओढत असतानाच पोलिसांनी राजेशला पकडले.

मोबाइल लोकेशनवरून आरोपी गजाआड

तलासरी पोलिसांनी दोन पथके तयार करून मोबाइल लोकेशन काढून चारोटी येथे प्रेयसीच्या मागावर आलेल्या राजेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मुलाची माहिती घेऊन अपहरण झालेल्या कमलेशला सोमवारी रात्री आठच्या दरम्यान सोडवून आईच्या ताब्यात दिले. ही कारवाई  तलासरीचे पोलिस निरीक्षक अजय वसावे, पोलिस उपनिरीक्षक उमेश रोठे, उपनिरीक्षक गायकवाड तसेच तलासरी पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी पार पाडली.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस