... then writers and poets will find it difficult to write | ...तर लेखक-कवींनाही लिहिणे कठीण होईल

...तर लेखक-कवींनाही लिहिणे कठीण होईल

ठाणे : पूर्वीचे नेते अतिशय खिलाडूवृत्तीने व्यंगचित्रांकडे पाहत असत. आज नेमके उलटे झाले आहे. या स्वयंघोषित कार्यकर्त्यांमुळे व्यंग्यचित्रकार शोधूनही सापडत नाहीत. अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांनी समज देण्याची नितांत गरज आहे. हे संकट वेळीच रोखले नाही तर लेखक-कविंनाही पुढील काळात लिहिणे कठीण होऊन जाईल, अशी भीती ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार विवेक मेहत्रे यांनी व्यक्त केली.
शारदा प्रकाशन आणि सदानंद आयुर्वेद यांच्यातर्फे रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालयात प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ््यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

ते म्हणाले, सध्याच्या प्रदूषित वातावरणात व्यंग्यचित्रकारांवर कधीही हल्ला होऊ शकतो. आजचा राजकीय कार्यकर्ता अप्रगल्भ आहे. आपल्या नेत्याच्या फोटोचे टी-शर्ट घालून टाइमपास करीत हे कार्यकर्ते फिरत असतात. उपरोध, उपहास, कोपरखळ््या, शाब्दिक विनोद यापैकी काहीही त्यांना कळत नाही. फक्त दुसऱ्यावर हल्ला करणे समजते. त्यामुळे आज व्यंगचित्रे फारशी दिसत नाहीत. यावेळी त्यांनी सर्व लेखक- कविंच्या लेखनाबद्दल कौतुक केले.

या पुस्तकांचे प्रकाशन...
प्रकाशन सोहळ््यात कवी अरु ण पाटील यांचे आजकाल आणि सहदाचं पोयं हे दोन काव्यसंग्रह, लेखिका प्रतिभा कुलकर्णी यांचा खेळ तुझा न्यारा हा दीर्घकथासंग्रह आणि मायक्र ोसॉफ्ट एक्सेल वरील एमएस एक्सल शंभर टिप्स आणि ट्रिक्स अशी एकूण चार पुस्तके प्रकाशित झाली.

यावेळी प्रा. राम नेमाडे म्हणाले, मराठी भाषा संपते आहे अशी उगीच आवई उठवणाऱ्यांचा यावेळी त्यांनी खरपूस समाचार घेतला. प्रमुख वक्त्या लीला गाजरे यांनी मराठीची प्रत्येक बोलीभाषा जगावी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

लेखिका प्रतिभा कुलकर्णी, प्रा. अरु ण पाटील ,सृष्टि जगताप आणि लेखक प्रसाद जोशी यांनी आपल्या भाषणातून आपल्या लेखन प्रक्रि येचा प्रवास उलगडला. सदानंद आयुर्वेदच्या डॉ. अक्षता पंडित यांनी सर्व लेखकांचे अभिनंदन केले.

कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रज्ञा पंडित आणि मनिष पंडित यांनी केले तर लेखक बाबूराव शिंदे यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर प्रकाशक संतोष राणेदेखील उपस्थित होते.
 

Web Title: ... then writers and poets will find it difficult to write

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.