शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

...तर विरोधकांची शुगर वाढविणार, आरोग्यमंत्री सावंत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 09:00 IST

काही महिन्यांपूर्वी हाफकीनच्या मुद्द्यावरून सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : हाफकीनवरून मला डिवचले जात आहे. मी स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून, साखरनिर्मितीमध्ये पीएच.डी. केली आहे. मी स्वत: संशोधक असल्यामुळे मला डिवचू नका, अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिला. 

काही महिन्यांपूर्वी हाफकीनच्या मुद्द्यावरून सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती. त्याचा समाचार शनिवारी त्यांनी ठाण्यातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपुजन सोहळ्याच्या निमित्ताने घेतला. सावंत म्हणाले की, मी १९८६ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. त्यानंतर लेक्चरर म्हणून काम केले. पुण्यात २००१ पासून १०० इन्स्टिट्यूट चालवत आहे. २००८ मध्ये पहिला साखर कारखाना काढला. त्यानंतर त्याचे आठ कारखाने झाले आहेत.  कोणाकडून विकत घेतले नसल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. संशोधक असल्याने आरोग्य विषयाचे प्राधिकरण तयार करीत आहे.  १० दिवसांत ते प्राधिकरण अस्तिवात येईल. येत्या काळात महाराष्ट्र हेल्थ कार्ड उपलब्ध केले जाईल. जिल्हा रुग्णालयाचे काम १८ महिन्यांत पूर्ण झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.  टास्क फोर्सची बैठक शुक्रवारी घेतली असून, १५ मेपर्यंत कोरोना ओसरलेला दिसेल, असा दावा सावंत यांनी केला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, बदलापूरचे रुग्णालय १०० बेडचे करावे, शहापूर उपजिल्हा रुग्णालय करावे, खर्डी येथे ट्रॉमा सेंटर सुरू करावे.

टॅग्स :thaneठाणेTanaji Sawantतानाजी सावंत