एकाच दिवशी ठाण्यातून दोन मोटारसायकलींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST2021-07-09T04:25:44+5:302021-07-09T04:25:44+5:30
ठाणे : शहरातील मासुंदा तलाव भागातून गुरुवारी एकाच दिवशी दोन मोटारसायकलींची चोरी झाली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ७ ...

एकाच दिवशी ठाण्यातून दोन मोटारसायकलींची चोरी
ठाणे : शहरातील मासुंदा तलाव भागातून गुरुवारी एकाच दिवशी दोन मोटारसायकलींची चोरी झाली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ७ जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मासुंदा तलाव भागातील दत्त टॉवर बिल्डिंगमध्ये राहणारे सचिन म्हात्रे (४४) यांनी त्यांची मोटारसायकल त्यांच्या इमारतीजवळ उभी केली होती. ती १ जुलै रोजी रात्री ७.३० ते २ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान चोरीस गेली. त्याचदरम्यान श्रीकांत पानसरे यांचीही मोटारसायकल त्याच भागातून चोरीस गेली. या दोन्ही मोटारसायकलींचा एक आठवडा शोध घेऊनही त्या न मिळाल्याने अखेर याप्रकरणी म्हात्रे यांनी ७ जुलै रोजी चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सूरज जोंधळे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.