शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पेट्रोल पंप मालकाच्या कारमधून रोकडसह रिव्हॉल्व्हरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 18:58 IST

पेट्रोल पंपाचा मालक बँकेत काही कामासाठी गेल्यानंतर त्याच्या कारमधून गावठी रिव्हॉल्व्हरसह ७० हजारांचा ऐवज असलेली बॅग चोरीस गेल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. पोलिसांनी नाकाबंदी करुनही चोरटे पसार झाले आहेत.

ठळक मुद्दे हायस्ट्रीट मॉलजवळील घटनागावठी रिव्हॉल्व्हरसह ७० हजारांचा ऐवज लंपास कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे: माजीवडा येथील पेट्रोल पंपाचे मालक कुणाल कजारीया (३८) यांच्या कारमधून गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, पाच जिवंत काडतुसे आणि २० हजारांची रोकड अशा ७० हजारांच्या ऐवजाची चोरी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.कॅसलमिल येथील विकास कॉम्पलेक्समध्ये राहणारे कजारीया हे ९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी भागातील हायस्ट्रीट मॉल येथे गेले होते. त्यावेळी कार चालक जवळच असल्याने कारला लॉक न करताच रस्त्याच्या कडेला कार उभी करुन ते एचडीएफसी बँकेत काही कामानिमित्त गेले. पंधरा मिनिटांच्या अंतराने ते कारजवळ परतले. पण, तोपर्यंत त्यांच्या कारमधील मागच्या सीटवरील २० हजारांची रोकड, ५० हजारांचे एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे असलेली बॅग चोरटयांनी लंपास केली. कजारीया यांच्या मागोमाग त्यांचा चालकही पाणी पिण्यासाठी गेला होता. हीच संधी साधून चोरटयांनी ही बॅग लंपास केली. त्यांनी सुरक्षेसाठी परवाना असलेले गावठी पिस्तुल खरेदी केले होते. ते चोरीस गेल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे. त्याचा कोणीही गैरवापर करण्याची भीती असल्याने पोलिसांनी बुधवारी तातडीने नाकाबंदीही केली होती. परंतू, हे चोरटे आढळले नाही. सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या चोरीचा तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी