शिधावाटप दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:48 IST2021-09-10T04:48:08+5:302021-09-10T04:48:08+5:30

-------------------------- तोतया पोलिसांनी वृद्धेला लुबाडले डोंबिवली : बारकू भोईर या वृद्धेला कोळेगाव येथून मोठागाव येथे येत असताना दोघा भामट्यांनी ...

Theft at the ration shop | शिधावाटप दुकानात चोरी

शिधावाटप दुकानात चोरी

--------------------------

तोतया पोलिसांनी वृद्धेला लुबाडले

डोंबिवली : बारकू भोईर या वृद्धेला कोळेगाव येथून मोठागाव येथे येत असताना दोघा भामट्यांनी थांबविले. एका म्हातारीला चाकूने मारून चोरटे पळून गेले आहेत, खबरदारी म्हणून तुम्ही तुमचे दागिने पिशवीत काढून ठेवा, असे खोटे सांगून बारकू यांच्याजवळील २८ हजार ५०० रुपयाचे दागिने घेऊन दोघांनी पोबारा केला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बारकू यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

-------------------

प्राणघातक हल्ला

कल्याण : शिवीगाळ केल्याप्रकरणी झालेल्या वादात आशिष पांडे, कुमार शेट्टी, दहीभाई, रोहन मिश्र ऊर्फ राजा पंडित या चौघांनी नीरज चौहान याच्यावर तलवार आणि रॉडसारख्या हत्याराने हल्ला केला. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजता पूर्वेतील कैलासनगर परिसरातील रवी हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी चौहान याच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------

मटका जुगार अड्ड्यावर धाड

कल्याण : आंबिवली रेल्वेस्थानकाच्या बाजूला मोहने गाव येथे जुगार अड्डा चालू असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, विलास मालशेटे, संदीप भालेराव, राजेंद्र घोलप, प्रकाश पाटील, राजेंद्र खिल्लारे आदींसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून जुगार खेळत असलेल्या नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड, जुगाराची साधने, मोबाईल फोन, असा ८८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------------------------

Web Title: Theft at the ration shop