उल्हासनगरात नवरदेवाच्या घरी चोरी, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST2021-05-01T04:38:24+5:302021-05-01T04:38:24+5:30
उल्हासनगर : विकास दुबे यांचे बुधवारी रात्री आठ वाजता प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये लग्न असल्याने ते सहकुटुंब घर बंद करून ...

उल्हासनगरात नवरदेवाच्या घरी चोरी, गुन्हा दाखल
उल्हासनगर : विकास दुबे यांचे बुधवारी रात्री आठ वाजता प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये लग्न असल्याने ते सहकुटुंब घर बंद करून गेले असताना चोरट्यानी मध्यरात्री बंद घरात प्रवेश करून कपाटातील रोख अडीच लाख रुपयांसह सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा ३ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास केले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ रघुनाथनगरमध्ये विकास दुबे कुटुंबासह राहतात. त्यांचे २८ एप्रिलच्या बुधवारी रात्री ८ वाजता प्रवीण इंटरनॅशनल हॉटेल येथे लग्न असल्याने, कुटुंबासह घरबंद करून लग्नासाठी गेले. लग्न लागल्यानंतर मध्यरात्री ३ वाजता नवरीला घेऊन बिकास दुबे घरी आले. तेव्हा घराचे दार आतून बंद असल्याने, त्यांना धक्का बसला. अधिक चौकशी केली असता, खिडकीतून चोरांनी घरात प्रवेश केल्याचे उघड झाले. घरातील लोखंडी कपाटातून रोख अडीच लाख रुपये, सोन्याचे दागिने, लॅपटॉप असे एकूण ३ लाख ६३ हजारांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल केला.
...........