नौपाड्यात रक्षकानेच केली लाखोंची चोरी
By Admin | Updated: August 10, 2015 23:37 IST2015-08-10T23:37:24+5:302015-08-10T23:37:24+5:30
टेंभी नाका येथील ‘अनिल ज्वेलर्स’ या सराफाच्या दुकानात रामबहादूर या सुरक्षारक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने लाखोंचा ऐवज लंपास केला.

नौपाड्यात रक्षकानेच केली लाखोंची चोरी
ठाणे : टेंभी नाका येथील ‘अनिल ज्वेलर्स’ या सराफाच्या दुकानात रामबहादूर या सुरक्षारक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने लाखोंचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकांनी निर्मिती केली आहे. रामबहादूरच्या घरातून चार लाख १० हजारांची १२ किलो ८०० ग्रॅम चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
‘ब्राइट बिल्डिंग’, गाळा नं. १५ येथे ७ आॅगस्टच्या रात्री ही चोरी झाली. दुकानाच्या पाठीमागील एक्झॉस्ट फॅनची लोखंडी जाळी गॅसकटरने कापून त्याद्वारे या दुकलीने प्रवेश केला. त्याच कटरने दुकानातील लोखंडी तिजोरीचा दरवाजा कट करून तिजोरी आणि शोकेसमधील सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला. (प्रतिनिधी)