आरोग्य केंद्रात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:46 IST2021-09-23T04:46:43+5:302021-09-23T04:46:43+5:30

--------------- दुचाकी चोरीला डोंबिवली : चंद्रकांत पडवळ यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजता पश्चिमेतील दिनदयाळ चौकाच्या ...

Theft at the health center | आरोग्य केंद्रात चोरी

आरोग्य केंद्रात चोरी

---------------

दुचाकी चोरीला

डोंबिवली : चंद्रकांत पडवळ यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजता पश्चिमेतील दिनदयाळ चौकाच्या बाजुला रत्नदीप सोसायटीच्या बाहेर घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------

कोरोनाचे ७२ रुग्ण

कल्याण : केडीएमसी हद्दीत बुधवारी नवीन ७२ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, रुग्णालयात दाखल असलेले ४९ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर सध्या ६३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मनपा केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३८ हजार ८५९ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

---------------------------------------

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कल्याण : गंधारे परिसरातील ‘महावीर हाईट्स’च्या सदस्यांनी सोसायटीच्या गणेशोत्सवात गणरायाला प्रसाद म्हणून मोदक, पेढे आणण्याऐवजी वह्या व शैक्षणिक साहित्य अर्पण करावे, असे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसादाच्या रूपाने जमा झालेल्या सर्व वह्या व शैक्षणिक साहित्य भिवंडी तालुक्यातील जि. प. शाळा, पेंढरीपाडा या अतिदुर्गम आदिवसी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले. याबाबत शाळेतील शिक्षक मेघनाथ तरे यांनी सोसायटीतील सर्व सदस्यांचे आभार मानले.

--------------------

Web Title: Theft at the health center