मोहोने स्मशानभूमीतील बर्निंग स्टॅण्डची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST2021-05-05T05:07:02+5:302021-05-05T05:07:02+5:30

टिटवाळा : मोहने येथील आर. एस. डेअरी फार्मनजीकच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली असतानाच अंत्यसंस्कारासाठी उभारलेले तीन लोखंडी स्टॅण्ड चोरांनी ...

Theft of the burning stand at Moho Cemetery | मोहोने स्मशानभूमीतील बर्निंग स्टॅण्डची चोरी

मोहोने स्मशानभूमीतील बर्निंग स्टॅण्डची चोरी

टिटवाळा : मोहने येथील आर. एस. डेअरी फार्मनजीकच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली असतानाच अंत्यसंस्कारासाठी उभारलेले तीन लोखंडी स्टॅण्ड चोरांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी केडीएमसीचे अधिकारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे कळते.

जीर्ण अवस्थेतील या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी तीन स्टॅण्ड होते. मात्र, ते ते तीनही चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी येथे नवीन स्मशानभूमी उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. केडीएमसी प्रशासनाने स्मशानभूमीसाठी ५० लाख रुपयाची तरतूदही केली होती. मात्र, आता अदानी समूह व पालिका प्रशासनाच्या बैठका झाल्या असून अदानी समूहाने स्मशानभूमीसाठी २२ गुंठे जागा देण्याचे कबूल केल्याचे कळते. यामुळे लवकरात लवकर प्रस्तावित स्मशानभूमीचे काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

------------------

Web Title: Theft of the burning stand at Moho Cemetery