रेल्वे आंदाेलनाचा ‘ताे’ गुन्हा अमान्य: राज ठाकरे
By जितेंद्र कालेकर | Updated: December 11, 2025 19:04 IST2025-12-11T19:04:54+5:302025-12-11T19:04:54+5:30
उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाणीचा आराेप: आता सुनावणी १६ डिसेंबरला

रेल्वे आंदाेलनाचा ‘ताे’ गुन्हा अमान्य: राज ठाकरे
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: रेल्वे विभागाने २००८ मध्ये राबविलेल्या भरती प्रक्रीयेच्या वेळी उत्तर भारतीय उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला हाेता. याच प्रकरणात मनसेच्या सात कार्यकर्त्यांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला हाेता.
याच प्रकरणात राज यांनी ठाणे सत्र न्यायालयात गुरुवारी सकाळी हजेरी लावली. त्यावेळी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचे त्यांनी न्यायालयापुढे सांगितले. त्यानंतर आराेप निश्चित (चार्ज फ्रेम) करुन हा खटला पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाला सहकार्य करा, एक महिन्यातच खटला निकाली लागण्याची शक्यता असल्याचेही ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
असे हाेते प्रकरण-
रेल्वेतील काही पदांसाठी अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने १९ ऑक्टाेबर २००८ राेजी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. मुंबईत या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तसेच बिहारी उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आराेप झाला हाेता. याच संदर्भात कल्याण रेल्वे पेालीस ठाण्यात आकाश काळे, संताेष ठाकरे, िवशाल कांबळे, कैलाश चाैबे, गणेश चाैबे, शैलेश जैन आणि निलेश घाेणे या सात जणांविरुद्ध २०१९ मध्ये आराेपपत्र दाखल झाले हाेते. पुरवणी आराेपपत्रात मनसे अध्यक्ष राज यांचेही नाव समाविष्ट केले हाेते.
आराेपींपैकी निलेश घाेणे याचा मृत्यू झाला. यापूर्वीची सुनावणी १२ नाेव्हेंबर २०२५ राेजी झाली हाेती. त्यावेळी राज हे न्यायालयात गैरहजर हाेते. १२ डिसेंबरच्या सुनावणीसाठी सर्व आराेपींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. शिवाय (राज ठाकरे वगळता) सातही आराेपींना न्यायालयाने अटक वाॅरन्ट बजावले हाेते. त्यामुळेच गुरुवारी राज यांच्यासह सर्वच आराेपी न्यायालयात हजर हाेते. सकाळी ११ वाजता सुनावणी सुरु झाल्यानंतर रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाणीचा गुन्हा कबूल आहे का? अशी राज यांना न्यायालयाने िवचारणा केली. तेंव्हा गुन्हा अमान्य असल्याचे त्यांनी उत्तर दिले.
त्यानंतर चार्ज फ्रेम करीत असल्याचे सांगत सहकार्य करण्याचे आवाहनही न्यायालयाने राज यांना केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या सुनावणीतच पुढील तारीख मिळाल्यानंतर राज न्यायालयाच्या बाहेर पडले. ॲड. राजेंद्र शिराेडकर, सयाजी नांगरे, ओंकार राजूरकर आणि मंदार लाेणारे आदींनी राज यांच्यासह सर्व आराेपींची बाजू मांडली. या सुनावणीनंतर न्यायालयाच्या बाहेर आणि शासकीय विश्रामगृहात राज यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मनसे आणि शिवसेनेच्या उद्धव गटाने माेठी गर्दी केली हाेती.
यातील राज ठाकरे वगळता सात आराेपींना प्राेक्लमेशन जारी केले हाेते. आज सर्व आराेपींचे प्राेक्लेमेशन रद्द झाले. पुढील सुनावणी आता १६ डिसेंबरला हाेणार आहे. - ॲड. ओकार राजूरकर, राज ठाकरे यांचे वकील.