शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शिक्षिकेने चिमुरड्याला ठेवले बांधून; पालकांची कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 14:05 IST

शिक्षिकेने पुन्हा बांधण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पाचपाखाडीतील प्रतिष्ठित युरो किड्स या शिशुवर्गाच्या शाळेतील शिक्षिकेने तीन वर्षांच्या चिमुरड्याला ओढणीने बांधल्याचा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाल्याचा दावा चिमुरड्याचे वडील दिनेश शेट्टीगर यांनी केला आहे. तसेच शिक्षिकेने पुन्हा बांधण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली असून याबाबत नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. शेट्टीगर यांचे हे पत्र शनिवारी सोशल मीडियावरही व्हायरल झाले. या पत्रात त्यांनी आपल्या आहान दिनेश शेट्टीगर या मुलावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिली. पाचपाखाडीतील या प्ले स्कूलमध्ये १६ जून रोजी दुपारी २ वाजता आहानची आई त्याला घेण्यासाठी शाळेत गेली. तेव्हा त्याच्या वागण्यात बदल झालेला दिसला. शिक्षिका प्राजक्ता पठारे यांनी त्याला बांधून ठेवल्याचे सांगितले. त्या शिक्षिका ओरडतात. त्यामुळे शाळेतच जायचे नाही, असा पवित्रा आहान याने घेतल्याने शेट्टीगर यांना धक्का बसला. 

शेट्टीगर यांनी शाळेच्या प्रमुख निवेदिता मुखर्जी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मुलाला बांधले नव्हते तर केवळ हात पकडून ठेवले होते, असा दावा केला. शेट्टीगर यांनी सीसीटीव्ही चित्रण पाहिले. तेव्हा शिक्षिकेने आहानला हाताने फटका मारल्याचे तसेच दोनदा ओढणीने बांधल्याचे दिसले. यासंदर्भात शाळेच्या प्रभारी निवेदिता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. या शिक्षिकेवर कारवाईचे आश्वासन निवेदिता यांनी दिल्याचेही शेट्टीगर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस