शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबरनाथमध्ये भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना दणका; पक्षाने केलं निलंबित
2
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन
3
एमआयएमच्या पदयात्रेत मोठा राडा; जलील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी!
4
कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी
5
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
6
Riitual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
7
आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा जनरल कॅटेगरीवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
8
एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
9
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
10
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
11
Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष
12
भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
13
"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
14
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
15
Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
16
अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
17
"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
18
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
19
महिला वाढल्या, कंपन्यांच्या चुका अन् खर्चही कमी झाला; 5000 कंपन्यांच्या डेटातून खुलासा
20
"मुलाला माझं नाव ठाऊक नव्हतं, पण त्याने सूरजमुळे मला ओळखलं...", रितेश देशमुखने सांगितला खास किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रिय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा कोलमडली; निवडणुकीबाबत मिळत नाही माहिती; राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:36 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत एकाही दिवशी या निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती वरिष्ठांना किंवा माध्यमांना दिली नाही. 

ठाणे/ कल्याण : ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमध्ये नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी हे निष्क्रिय व बेजबाबदार आणि ढिसाळ कारभार करणारे असल्याच्या तक्रारी थेट राज्य निवडणूक आयुक्तांपर्यंत करण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत एकाही दिवशी या निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती वरिष्ठांना किंवा माध्यमांना दिली नाही. 

ठाण्यात मुख्य निवडणूक अधिकारी अर्थात आयुक्त आहेत. त्यांच्या हाताखाली एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त, ११ निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या हाताखाली तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. एवढी मोठी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असूनही निवडणूक निर्णय अधिकारी हे सक्षमपणे काम करू शकलेले नाही. 

‘आरओ’ झाले रिचेबलमुंबई : निवडणूक प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यापासून अर्ज माघारीपर्यंत सर्वांत महत्त्वाची भूमिका असलेले ‘आरओ’ अर्थात निवडणूक निर्णय अधिकारी सुरुवातीला संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते, मात्र आता हे अधिकारी रिचेबल झाले आहेत.  

कल्याण डोंबिवलीत नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नेमले. त्यांच्याकडून महापालिका मुख्यालयातील निवडणूक कार्यालयास वेळेत माहिती दिली जात नसल्याने उमेदवारी अर्ज किती भरले, किती अर्ज छाननीत बाद झाले ही माहिती मिळत नव्हती. 

अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली नाहीनिवडणूक अधिकाऱ्यांमध्ये महेश पाटील, अर्चना खेतमाळीस, राजू थोटे, वरुणकुमार सहारे, अश्विनकुमार पोतदार, आशा तामखेडे, प्रशांत जोशी, संजय पाटील, जर्नादन कासार यांचा समावेश आहे. पण,  त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन भूमकर यांच्याकडे  तक्रार केल्यास त्यांच्याकडून सांगण्यात येते की, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती आली नाही. त्यामुळे काय करणार? जनसंपर्क विभागाचे अधिकारी संजय जाधव व माधवी फोफळे यांच्याकडेही वेळेवर माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यांनीदेखील हतबलता दाखविली.  

मिरा-भाईंदरमधील लेटलतीफ कामावर टीका -मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठीची गेले दोन-तीन दिवसांतील कामकाज प्रक्रिया पाहता निवडणूक निर्णय अधिकारी व पालिकेच्या ढिसाळ तसेच लेटलतीफ कामावर टीका होत आहे. 

७ निवडणूक कार्यालये थाटली आहेत. शिवाय कामकाजासाठी अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रसामग्री दिलेली आहेत. मात्र, आरओ कार्यालयाकडून आलेले अर्ज, छाननी, वैध व अवैध यादी, अंतिम यादी आदी कामांत वेळकाढूपणा होत आहे. त्यामुळे संताप आहे.उमेदवारांचे अर्ज लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड होतील’, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Inactive election officers cripple system; complaints to State Election Commissioner.

Web Summary : Complaints filed against inactive election officers in Thane. Information regarding candidate applications was not provided promptly. The municipal corporation's slow processing of applications is also facing criticism.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2026Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६