समाज कल्याण निरीक्षकानेच केला विनयभंग; गुन्हा दाखल, चौकशी सुरू
By जितेंद्र कालेकर | Updated: January 29, 2024 22:04 IST2024-01-29T22:04:35+5:302024-01-29T22:04:45+5:30
१५ जानेवारी २०२४ रोजी याप्रकरणी ३५४-अ आणि ५०६ या कलमान्वये हा गुन्हा ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे

समाज कल्याण निरीक्षकानेच केला विनयभंग; गुन्हा दाखल, चौकशी सुरू
ठाणे: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक महेश अळकुटे (४०) यांनी एका ५३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. विशेष म्हणजे यातील पिडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याने ती मनोधैर्य योजनेंतर्गत राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी अळकुटे यांच्याकडे गेली होती. त्याच दरम्यान, त्यांनी तिचा विनयभंग केल्याचा तिने आरोप केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जानेवारी २०२४ रोजी याप्रकरणी ३५४-अ आणि ५०६ या कलमान्वये हा गुन्हा ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच मजल्यावरील समाज कल्याण निरीक्षक अळकुटे यांच्या कार्यालयात घडल्याचेही या पिडितेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली.