पवित्र पोर्टलची साईट स्लो; कालावधी वाढवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 19:40 IST2024-02-08T19:39:37+5:302024-02-08T19:40:12+5:30
प्राधान्य क्रम नोंदविण्यात टेट पात्रताधारकांना अडचण

पवित्र पोर्टलची साईट स्लो; कालावधी वाढवण्याची मागणी
बोर्डी - शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर पात्रताधारण उमेदवारांसाठी विविध शाळांचे प्राधान्य क्रम नोंदणीला गुरुवारी प्रारंभ झाला. मात्र सकाळपासून ही साईट स्लो झाल्याने दिवसभर खूपच कमी उमेदवारांना नोंदणी करता आली.
डहाणू तालुक्यातील विविध ठिकाणी सायबर कॅफे बाहेर रांगा लागल्या होत्या, तर मोबाईलवरूनही प्राधान्य क्रम भरता न आल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला. दरम्यान 9 फेब्रुवारी पोर्टलवर नोंदणीची अंतिम तारीख असल्याने शिवाय शुक्रवारी तालुक्यात वीज खंडीत होत असते. त्यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नोंदणीसाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.