पाहुणा आलेल्या चिमुकल्या 'नक्ष' ची सुखरूप सुटका
By अजित मांडके | Updated: November 10, 2023 22:56 IST2023-11-10T22:55:47+5:302023-11-10T22:56:15+5:30
नक्ष राजपूत हा तीन वर्षीय चिमुकला त्या घरात शुक्रवारी रात्री अडकल्याची माहिती

पाहुणा आलेल्या चिमुकल्या 'नक्ष' ची सुखरूप सुटका
ठाणे: पाहुणा आलेल्या तीन वर्षीय चिमुकला नक्ष राजपूत हा घराचा मुख्य दरवाजा बंद झाल्याने आत अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गावंडबाग, उपवन येथे समोर आली. त्यानंतर ३० ते ४० मिनिटांनी अडकलेल्या 'नक्ष' ची बाळकुम अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.
उपवन, गावंडबाग येथील रत्नतेज बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील रुम नं. ४०६ मध्ये सचिन सिंग हे भाडेकरू आहेत. त्यांच्याकडे पाहुणा आलेला नक्ष राजपूत हा तीन वर्षीय चिमुकला त्या घरात शुक्रवारी रात्री अडकल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बाळकुम अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी त्या रूमच्या दरवाजाची ग्रील बोल्ड कटरच्या सहाय्याने तोडून दरवाजा उघडून त्या चिमुकल्याची सुखरूप सुटका करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.