शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचा धर्म या निवडणुकीतही पाळला जाईल; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

By अजित मांडके | Updated: October 28, 2024 14:57 IST

केळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  "महायुतीचा उमेदवार या मतदारसंघात उभा आहे. महायुती विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असून या मतदारसंघातूनच नव्हे तर सर्वच मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निवडून येतील," असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केला.  ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

महायुतीचा धर्म या निवडणुकीमध्ये देखील पाळाला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नौपाडा, राम मारुती रोड या भागातून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही अंतरापर्यंत फडणवीस सामील झाले होते. सोमवारी सकाळी  साडे दहाच्या सुमारास केळकर यांनी घंटाळी देवीचे दर्शन घेतले. घंटाळीवरुन गोखले रोड मार्गे, जांभळीनाक्यावरुन पुढे टेंभी नाक्यावर दाखल झाले. येथे संजय  केळकर यांनी आनंद आश्रमात जाऊन दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ही रॅली साडे बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. यावेळी ज्या ज्या भागातून ही रॅली गेली, त्या त्या भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. गडकरी रंगायतन परिसरातही कोंडीचे चित्र दिसून आले.

दरम्यान, "उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीतील सर्व मंडळी उपस्थित होते. त्यामुळे महायुतीचाच विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून मतदार राजा आर्शिवाद देईल हे निश्चित आहे," असं संजय केळकर यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthane-acठाणे शहरEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती