शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांनी केला संपूर्ण वर्ग उद्ध्वस्त, वर्ग सुरू व्हायला आठवडा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 11:37 IST

वर्गातील सामानाचीच नव्हे तर दारे, खिडक्यांचेही नुकसान केले.

बदलापूर : येथील शाळेतील शैक्षणिक साहित्य तसेच वर्गाची नासधूस संतप्त जमावाने केल्याने शिशू वर्ग, प्ले ग्रुप पुढील किमान आठवडाभर बंद राहणार आहेत. अन्य वर्ग पुढील दोन दिवसात सुरू करू, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.

शाळेतील दुर्दैवी घटनेनंतर मंगळवारी संतप्त जमावाने शाळेची तोडफोड केली. त्यात शाळेचे प्रचंड नुकसान झाले असून, प्ले ग्रुपचे वर्ग पूर्णपणे नष्ट झाले. तेथील खेळणी, बाके, शैक्षणिक साहित्य, फळे, काचा, पंखे वगैरे वस्तू मोडून तोडून टाकल्या.

वर्गातील सामानाचीच नव्हे तर दारे, खिडक्यांचेही नुकसान केले. शिशू वर्ग पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागेल. अन्य इयत्तांचे वर्ग सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. बदलापूर शहरातील वातावरण शांत झाल्यावर पोलिस प्रशासनाचा सल्ला घेऊन शाळा सुरू करणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. 

भविष्यात पालकांवर भुर्दंड वाढणार    शाळेतील घटना संतापजनक असली, तरी पालकांनी व्यक्त केलेली तोडफोडीची प्रतिक्रिया ही भविष्यात पालकांवरील भुर्दंड वाढवणारी आहे.     शाळेचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्याकरिता लागलीच नाही तरी भविष्यात कदाचित पुढील वर्षी शाळा फी वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.    त्यामुळे शाळेचे नुकसान अखेरीस पालकांच्या खिशातून त्यांना भरून द्यावे लागणार आहे, असे मत काही पालकांनीच व्यक्त केले.

टॅग्स :badlapurबदलापूर