दिव्यात छताचे प्लास्टर कोसळले, दोन जण जखमी

By कुमार बडदे | Updated: August 1, 2024 08:11 IST2024-08-01T08:10:58+5:302024-08-01T08:11:23+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क    मुंब्राः छताचे प्लास्टर कोसळून दोण जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे  दिव्यात घडली.दिवा शहरातील दिवा-आगासन ...

The plaster of the ceiling collapsed in the lamp, injuring two people | दिव्यात छताचे प्लास्टर कोसळले, दोन जण जखमी

दिव्यात छताचे प्लास्टर कोसळले, दोन जण जखमी

 लोकमत न्यूज नेटवर्क 
  मुंब्राः छताचे प्लास्टर कोसळून दोण जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे  दिव्यात घडली.दिवा शहरातील दिवा-आगासन रस्त्या जवळील बेडेकर नगर परीसरातील साई मंदिरा जवळ असलेल्या गणेश चाळीत अरुण म्हात्रे यांच्या मालकीची तळ अधिक एक मजली इमारत  आहे.

१० ते १५ वर्षापूर्वी बाधण्यात आलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावरील रुम नंबर १ च्या छताच्या प्लास्टरचा काही भाग गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कोसळला.या घटनेत  संतोष शिंदे हे किरकोळ जखमी झाले असून,शर्मिला शिंदे यांच्या डोक्याला आणि चेह-याला मार लागल्याने त्य गंभिर जखमी झाल्या आहेत.उपचारासाठी त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रुग्णालयातील वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी (सीएमओ)डाँक्टर आरती पगारे  यांनी याबाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. पुढील कार्यवाही साठी या घटनेची माहिती संबंधित विभागाला  कळविण्यात आल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.

Web Title: The plaster of the ceiling collapsed in the lamp, injuring two people