शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi : भिवंडी न्यायालयात वकील महिलेचे फोटो काढणाऱ्या मानसिक विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले

By नितीन पंडित | Updated: March 10, 2023 20:31 IST

Bhiwandi News: भिवंडी न्यायालयात एका महिला वकिलाचे फोटो मोबाईलवर शूट करणाऱ्या विकृत तरुणास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून चोप दिला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.

- नितीन पंडित भिवंडी - भिवंडीन्यायालयात एका महिला वकिलाचे फोटो मोबाईलवर शूट करणाऱ्या विकृत तरुणास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून चोप दिला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. विशेष म्हणजे या विकृत तरुणाचे मोबाईल जप्त केले असता त्याच्या मोबाईलमध्ये साठ हजार हून अधिक फोटो असून विविध ठिकाणच्या महिलांचे हजारो फोटो असल्याची बाब उघड झाली आहे.या विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शांतिनगर पोलीस ठाण्यात नेत त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वकार अन्सारी वय ४५ वर्ष राहणार मिल्लत नगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विकृत तरुणाचे नाव आहे. त्याने शुक्रवारी दुपारी भिवंडी न्यायालयात एका महिला वकीलाचे फोटो मोबाईल मध्ये काढले होते.हि बाब महिला वकिलाच्या निदर्शनात येताच त्यांनी आपल्या वरिष्ठ वकिलांना याबाबत माहिती दिली.भिवंडी वकील संघटनेचे पदाधिकारी ऍड.मंजीत राऊत व ऍड.किरण चन्ने यांनी या विकृतास पकडून चोप दिला.व त्याचे मोबाईल जप्त केले असता त्याच्या मोबाईल मध्ये ६० हजारांहून अधिक फोटो असून विविध स्थानक व भागातील महिलांचे हजारहुन अधिक फोटो असल्याची बाब ऍड किरण चन्ने यांना समजताच त्यांनी या विकृतास आपल्या सहकारी वकीलांसह शांतीनगर पोलीस ठाण्यात नेऊन त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे या विकृताने विविध भागातील महिलांचे एवढे फोटो का व कशासाठी काढले आहेत याचा तपास पोलीस करत असून या विकृतास कठोर शिक्षा करावी अशी मागणी एड. किरण चन्ने यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी