शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना काय ते मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी शिकवू नये; आनंद परांजपेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 09:20 IST

पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर मी कायदेशीर त्याला उत्तर देईन. मी दोन पिढ्यांचा शिवसैनिक आहे असं आनंद परांजपे यांनी म्हटलं.

ठाणे - राष्ट्रवादी गटनेते जयंत पाटील यांचं गुरुवारी विधानसभेत अधिवेशन कालावधीपुरतं निलंबन करण्यात आले. जयंत पाटलांवरील या कारवाईविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन करत सरकारचा निषेध केला. त्यात ठाण्यात झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून जिल्ह्यात पोलीस तक्रारी दिल्या जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला आनंद परांजपे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 

आनंद परांजपे म्हणाले की, गुरुवारी संध्याकाळी जयंत पाटील यांचे निलंबन विधानसभेत करण्यात आले त्याविरोधात ठाण्यात आंदोलन करण्यात आले. त्यात मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मीदेखील लोकसभेचा खासदार राहिलो आहे. आंदोलनात वापरलेले शब्द जातीजातीत तेढ निर्माण करणारे, धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे अथवा कुणाचाही अपमान करणारे असे नव्हते. ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी गुन्हे नोंद करण्याचं काम सुरू आहे. त्याचं स्वागत करतो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर मी कायदेशीर त्याला उत्तर देईन. मी दोन पिढ्यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार आहेत. ८६ सालापासून मी शिवसैनिक म्हणून काम करत होतो. तेव्हा यांचा जन्मही झाला नसेल. त्यावेळी माझे वडील प्रकाश परांजपे नगरसेवक होते. शिवसेना काय हे मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी मला शिकवू नये. मी घाबरणार नाही. मी लोकशाहीत विचारांची लढाई, राजकीय लढाई लढत राहणार असा निर्धारही आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे. काय आहे प्रकरण?जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली. "तख्त बदल दो, ताज बदल दो ; गद्दारो  का राज बदल दो, निर्लज्ज सरकारचा निषेध असो, ईडी सरकार मुर्दाबाद, पन्नास खोके -एकदम ओके, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा निषेध असो" अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली त्याविरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने सगळीकडे आनंद परांजपे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील