शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाने मागितली ५० लाखांची लाच

By धीरज परब | Updated: January 18, 2024 22:50 IST

Mira Road: तक्रारदार वकील असून त्यांचे  अशील असलेले गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार ह्याने ५० लाखांची लाच मागितली .

मीरारोड -  तक्रारदार वकील असून त्यांचे  अशील असलेले गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार ह्याने ५० लाखांची लाच मागितली. त्यातील १५ लाखांचा हप्ता घेताना गणेश वनवे ह्या पोलीस हवालदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मीरारोड मधून रंगेहाथ अटक केली आहे . तर निरीक्षक शेलार पसार झाला असून त्याला २०१५ साली सुद्धा ५० हजारांची लाच घेताना सावंतवाडी येथे  पकडण्यात आले होते . 

मुंबईच्या पारसी धोबीघाट भागात राहणारे मानव परदेशी यांच्या फिर्यादीवरून मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात २ डिसेम्बर रोजी   दिनेश चव्हाण व अजय जबडे सह मारसेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर तसेच विकास अग्रवाल , दुर्गेश कुमार उर्फ प्रवेश कुमा, सुमन नंदलाल पाल व अंजुमन चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता . रोख रकमेच्या बदल्यात संस्था , कंपन्या हा करोडो रुपये देत असल्याचे आमिष दाखवून परदेशी यांच्या कडून १२ लाख रोख घेऊन त्याला आरटीजीएस द्वारे जास्त रक्कम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली गेली होती . 

अशाच प्रकारे अन्य काही जणांची फसवणूक व फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने सदर गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आला होता . सदर गुन्ह्यातील एक पाहिजे आरोपी ला अटक न करण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी शेलार याने ५० लाखांची लाच मागितली होती . तडजोडी अंती ३५ लाखांवर मांडवली झाली . तक्रारदार हे आरोपीचे वकील असून त्यांनी या बद्दल ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केली . 

यातील भाईंदर पोलीस ठाण्यात असलेला गणेश वनवे हा या प्रकरणात आरोपी व वकील मार्फत मध्यस्थी अर्थात दलाली करत असल्याने ३५ लाखां पैकी पहिला हप्ता १५ लाखांचा देण्याचे ठरले .  या प्रकरणी ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर व सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील सह चव्हाण, पाटील, महाडिक, शिंदे ,भुजबळ, बर्गे यांच्या पथकाने १७ जानेवारीच्या रात्री उशीरा मीरारोड येथे सापळा रचला . 

पोलिसांनी सापळा रचला असताना वनवे हा आला आणि त्याने तक्रारदार वकिला कडून १५ लाखांची रोख लाच घेतली . वनवे याने लाच स्वीकारत गाडीतून पळून जात असताना  सापळा रचलेल्या पथकाने त्याला सुरभी कॉम्प्लेक्स जवळून अटक केली . वनवे हा भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असला तरी तो सध्या रजेवर होता . या घटने नंतर महेंद्र शेलार हा पसार झाला आहे . मीरारोड पोलीस ठाण्यात शेलार व वनवे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या दोघांची सखोल चौकशी केल्यास लाचखोरीच्या आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे .  पोलीस शेलार याचा शोध घेत आहेत . 

``विशेष म्हणजे २०१५ साली महेंद्र शेलार हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक असताना त्याने एका गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी १ लाखांची मागणी केली होती . त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी युनिटने शेलार याला ५० हजारांची लाच घेताना पकडले होते .  

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी