शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयातील घटना दुर्दैवी, सखोल चौकशी होणार, समितीही नेमली; CM शिंदेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 18:49 IST

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्ट रोज ५ रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना  ताजी असतांनाच शनिवारी गेल्या १२ तासात म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आले आहे. त्यात १० महिलांचा आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. तसेच यात ४ वर्षीय मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या घटनेनंतर रुग्णालय प्रशासन पुन्हा टीकेची धनी ठरली आहे. 

मृत पावलेल्यांमध्ये ४ वर्षे वयोगटापासून ते ८३ वर्षापर्यंत वयाच्या रुग्णांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. काही रुग्ण वयोवृद्ध होते तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयातून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, असा दावा प्रशासनाने केला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत आहेत. त्या तुलनेत डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

सदर प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी या प्रकरणाची सकाळीच माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने संपर्कात होते. वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेले रुग्ण आहेत. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. जो अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आले होते. काही खासगी रुग्णालयातूनही आले होते. गंभीर स्थितीत त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्व गोष्टी त्यांनी माझ्या कानावर घातल्या आहेत. तरीसुद्धा झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याची सखोल चौकशी होईल, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

१ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान रुग्ण दाखल-

कळवा रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यु झाला आहे, त्यातील रुग्ण हे १ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान रुग्णालयात दाखल झाले होते. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात ठाणे - ६, कल्याण - ४, भिवंडी -३ आणि उल्हासनगर, साकीनाका, गोवंडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

हे होते आजार-

जे रुग्ण दगावले त्यातील काही अपघातग्रस्त काहींनी अल्सर, लिव्हर खराब होणे, निमोनिया, विष प्राशन, डायलेसीस, डोक्याला मारहाण, युरीन इनफेक्शन, आॅक्सीजनची कमतरता, बीपी कमी होणे, ताप आदींमुळे मृत्यु झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मृत्यु झालेल्यांमध्ये एका ४ वर्षीय मुलाचा समावेश असून त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. तर इतर मृत्युमध्ये एका ८३ वर्षीय वृध्द महिलेसह ८१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर उर्वरीतांमध्ये ३३ ते ८३ वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार