शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात

By धीरज परब | Updated: December 31, 2025 13:00 IST

मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेनेची युती तुटली आहे. युती तुटल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीकास्त्र डागले.

- धीरज परब, मीरारोड मीरा भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहतांच्या घमेंडी वृत्तीमुळे भाजपा-शिवसेना महायुती झाली नाही. मेहतांच्या ह्याच घमेंडी आणि मनमानी वृत्तीमुळे २०१९ मध्ये मीरा भाईंदरच्या जनतेने त्यांना धडा शिकवला होता. तसाच धडा या महापालिका निवडणुकीत जनता पुन्हा शिकवेल", असा घणाघात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.  महापालिकेतील मेहतांची मनमानी फक्त शिवसेना आणि प्रताप सरनाईकच रोखू शकतो असे ते म्हणाले. 

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुतीतीलभाजपा, शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. भाजपाने ८७ जागी, तर शिंदेसेनेने ८१ जागी उमेदवार दिले असून, राष्ट्रवादीच्या ३४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. महायुती तुटल्यामुळे भाजपा व शिंदेसेनेत खरी लढत होणार आहे. 

प्रताप सरनाईक मेहतांबद्दल काय बोलले?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "मैत्री पूर्ण लढायचे होते तर महायुतीमध्ये हातात हात घालून लढायचे होते. आम्ही हक्काचे मागत होतो, ठाणे पॅटर्न प्रमाणे. शिवसेनेची अवहेलना आणि अपमान सहन करणार नाही. शिवसेनेने ८१ भारतीयांना उमेदवारी दिली आहे. मेहतांनी उमेदवार सांगताना जाती-पतीचा उल्लेख करून समाजात दुफळी माजवण्याचे काम केले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व जाती-समाजाला एकत्र जोडण्याचे काम करत असताना मेहता मात्र तोडण्याचे काम करत असून त्यांच्या अशा राजकारणाचा निषेध करतो", अशी टीका सरनाईक यांनी केली.  

"मेहतांच्या घमेंडी वृत्तीमुळे महायुती झाली नाही. हीच घमेंड आणि मनमानी वृत्तीमुळे २०१९ ला मीरा भाईंदरच्या जनतेने मेहतांना धडा शिकवला होता, तसाच धडा या महापालिका निवडणुकीत त्यांना जनता पुन्हा शिकवेल. महापालिकेतील मेहतांची मनमानी फक्त शिवसेना आणि प्रताप सरनाईकच रोखू शकतो", असा इशाराही सरनाईक यांनी यावेळी दिला. 

"शिवसेना ५० पेक्षा जास्त जागा जिंकेल. मेहताने पराभवाच्या भीतीने स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली नाही", असे म्हणत मंत्री सरनाईक यांनी आमदार मेहतांना डिवचले.

आमदार मेहतांनी काय मांडली होती भूमिका?

भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, "भाजपाने मराठी भाषिक २४, आगरी समाजास १५, गुजराती १२, राजस्थानी-जैन १४, उत्तर भारतीय १४, पंजाबी १, बंगाली १, दक्षिण भारतीय २, ख्रिश्चन समाजाच्या ४ जणांना उमेदवारी दिली आहे." 

"सर्व समाजाला स्थान दिले आहे. मागच्या वेळीपेक्षा जास्त जागा उत्तर भारतीयांना दिल्या आहेत. सर्वेनुसार ज्यांच्या सोबत जनाधार होता, त्यांना पक्षाने न्याय देत उमेदवारी दिली. काही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी देता आली नाही. बऱ्याच जणांनी माघार घेतली आहे व ज्यांनी नाही घेतली, त्यांना समजावून ते पण मागे घेतील", असे आमदार मेहता म्हणाले. 

"१ जागा आरपीआयच्या उमेदवार निर्मला सावळे यांना दिली आहे, पण त्या आमच्या चिन्हावर लढवणार आहेत. शिंदेसेनेला युतीसाठी १३ जागा देऊ केल्या होत्या. त्या ठाणे पॅटर्न प्रमाणेच होत्या. भाजपा यावेळी ७० पेक्षा जास्त जागा जिंकेल", असेही आमदार मेहतांनी सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Ego clash: Alliance breaks in Mira Bhayandar, Sarnaik slams Mehta.

Web Summary : Minister Sarnaik blames MLA Mehta's arrogance for the alliance breakdown in Mira Bhayandar. He accuses Mehta of dividing society and predicts a repeat of Mehta's 2019 electoral defeat. Mehta denies this, claiming fair seat distribution.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६pratap sarnaikप्रताप सरनाईकMahayutiमहायुतीBJPभाजपा