शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पाण्यासाठी ठामपाचे माजी विरोधीपक्ष नेते पठाण यांचे आयुक्तांच्या दालनाबाहेर बसून आंदोलन

By जितेंद्र कालेकर | Updated: June 7, 2024 16:51 IST

हजारो नागरिकांसह आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा.

जितेंद्र कालेकर, ठाणे: ठाणे, मुंब्रा - कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडले जात नसल्याने संतप्त झालेले माजी विरोधीपक्ष नेते अश्रफ (शानू) पठाण यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच शुक्रवारी आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा , कौसा परिसरात गेली चार दिवस पाणीपुरवठाच केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकर पाचारण करावे लागत आहेत. त्याविरोधात पठाण आक्रमक झाले हाेते. शुक्रवारी त्यांनी पालिका मुख्यालयात धडक देऊन आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदाेलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनानंतर  पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासनही दिले.

यावेळी पठाण म्हणाले की, ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात केली असली तर ९० टक्के पाणीपुरवठा केला जात नाही. गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुंब्रा - कौसा भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसात सुमारे ५० लाख रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ठामपाचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत. तसेच टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांची छळवणूक होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. येत्या सोमवारपर्यत पाणीपुवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांच्या घरासमोर दहा हजार नागरिकांसह आंदोलनाला बसू, असा इशाराही पठाण यांनी दिला.

शटडाउन लांबल्यामुळे उद्भवली समस्या-

‘ एमआयडीसीने ४ जून रोजी काही कामांसाठी मुंब्रा भागासाठी शटडाऊन घेतला होता. हे काम ५ जूनला संपणे अपेक्षित होते. परंतू, ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जूनला दुपारी २.३० वाजता संपले. त्यानंतर पाणी पुरवठा सुरु केला. मात्र, शटडाऊन नंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे शुक्रवार (७ जून पासून ) पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. शटडाऊन २४ तासांचा असला तरी त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. हीच समस्या होती. ती आता सुटली आहे.’ विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईStrikeसंप