शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुती समन्वय समितीची पहिली बैठक निष्फळ

By धीरज परब | Updated: December 26, 2025 22:32 IST

Mira Bhayander Municipal Corporation Election: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर मीरा भाईंदर मध्ये महायुतीचे जागा वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला असता त्यास भाजपा कडून नकार देत ठाणे पॅटर्न बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करू असे शिंदेसेनेस सांगण्यात आले.

- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुती समन्वय समितीची पहिली बैठक शुक्रवारी रात्री मीरारोडच्या भाजपा कार्यालयात झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर मीरा भाईंदर मध्ये महायुतीचे जागा वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला असता त्यास भाजपा कडून नकार देत ठाणे पॅटर्न बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करू असे शिंदेसेनेस सांगण्यात आले.

मीरा भाईंदर महापालिकेत युती व्हावी ह्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील बैठकी नंतर चव्हाण यांनी समन्वय समिती गठीत केली. चव्हाण यांनी युतीच्या चर्चेसाठी समिती गठीत केली असताना दुसरीकडे भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी युती नको असे सांगत ९९ टक्के युती होणार नाही असे म्हटले होते. तर समितीची बैठक व्ह्याच्या आधीच शुक्रवारी दुपारी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात सेनेला युती करायची असेल तर २१ जागांवरच चर्चा करावी, आमचे कार्यकर्ते परत पक्षात पाठवावे आणि शिवार उद्यान येथील टाऊनपार्क आरक्षण मधील लग्नाचा हॉल काढून मोकळे करावे अश्या अटी जाहीरपणे ठेवल्या. इतकेच काय तर शिवसेना भाजपच्या पाठिंब्या शिवाय जागा जिंकू शकत नाही पण भाजपाला सेनेची गरज नाही असे म्हटले होते.

तोच शुक्रवारी रात्री समन्वय समितीच्या बैठकीसाठी मंत्री सरनाईक हे जिल्हा प्रमुख राजू भोईर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रमप्रताप सिंह हे मीरारोड येथील भाजपा कार्यालयात दाखल झाले. मात्र त्यावेळी आ. मेहता हे बाहेर होते व तब्बल ३५ - ४० मिनिटांनी आले. तो पर्यंत मंत्री सरनाईक यांना आ. मेहतांची वाट बघत बसावे लागले. बैठकीसाठी आल्यावर आ. मेहतांनी मंत्री यांना थांबायला लागले म्हणून दिलगिरी देखील व्यक्त केली.

बैठकीत भाजपा कडून आ. मेहता सह जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास ह्या समिती सदस्य व्यतिरिक्त माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील उपस्थित होते. आ. मेहतांनी मंत्री सरनाईक यांचे स्वागत केले.

बैठकीत मंत्री सरनाईक यांनी युतीच्या आवश्यकते बद्दल बोलत ठाण्या मध्ये १३० पैकी आमचे ८२ व भाजपाचे २४ नगरसेवक असून तेथे आमचा पक्ष मोठा आहे तरी आम्ही युती केली आहे. ठाण्यात सेना भाजपात जमू शकते तर इकडे का नाही. आम्ही ठाण्यात मोठे मन दाखवले तसे मीरा भाईंदर मध्ये तुम्ही पण मोठे मन ठेवा आणि ठाण्याच्या धर्तीवर युती व जागा वाटप करा असा प्रस्ताव मंत्री सरनाईक यांनी दिला. ठाण्याच्या फॉर्म्युला प्रमाणे मीरा भाईंदर मध्ये शिंदे सेनेला महायुती मध्ये ३७ जागा बसतात.

ठाणे फॉर्म्युला बाबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या कडे चर्चा करू अशी भूमिका भाजपाने घेतली. आ. मेहता यांनी त्यांच्या कडील प्रत्येक प्रभाग व जागा निहाय कोण उमेदवार निवडून येऊ शकतो याची तयार केलीली माहिती मंत्री सरनाईक यांना दाखवली. त्यात तुमचे सेनेचे अनेक माजी नगरसेवक पराभूत होणार असल्याचा दावा केला गेला. मेहतांच्या सादर आकडेवारी वरून सेना केवळ १३ जागाच जिंकणार असल्याचे भाकीत यावेळी वर्तवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जवळपास अर्ध्या तासा नंतर बैठक आटोपती घेण्यात आली. दोन्ही नेत्यांनी  प्राथमिक चर्चा झाली असून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हातात असल्याने त्यात पुढे चर्चा होईल असे दोन्ही नेत्यांनी माध्यमांना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena Alliance Coordination Committee's First Meeting Inconclusive

Web Summary : The first meeting for the Mira Bhaindar Municipal Corporation alliance between BJP and Shinde Sena ended without agreement. Disagreement arose over seat allocation, with BJP rejecting the Thane pattern proposed by Sena. Further discussions are expected.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayanderमीरा-भाईंदरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६