दारुच्या नशेत उ्डाणपूलावरुन उडी घेतलेला चालक गंभीर जखमी

By जितेंद्र कालेकर | Updated: November 6, 2023 21:21 IST2023-11-06T21:21:03+5:302023-11-06T21:21:22+5:30

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा: ट्रक बिघडल्यानंतर घेतली उडी

The driver who jumped from the bridge while under the influence of alcohol was seriously injured | दारुच्या नशेत उ्डाणपूलावरुन उडी घेतलेला चालक गंभीर जखमी

दारुच्या नशेत उ्डाणपूलावरुन उडी घेतलेला चालक गंभीर जखमी

ठाणे: दारुच्या नशेतच ठाण्यातील तीन हात नाका येथील उड्डाणपूलावरुन उडी घेणारा ट्रक चालक सुलतान फेज महंमद रावमा (३४, रा. गुजरात) हा बचावला असून त्याचे हात फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.

गोव्यातून गुजरातच्या दिशेने सुलतान ट्रकमधून लोखंडाची वाहतूक करीत होता. त्याच्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे त्याने ६ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तीन हात नाक्यावरील उड्डाणपूलावर ट्रक उभा केला होता. त्याच दरम्यान दारुच्या नशेतच त्याने उड्डाणपूलावरुन अचानक उडी घेतली. यात त्याच्या हनुवटीला आणि हाताला मार लागला आहे. यामध्ये त्याचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. त्याने हे कृत्य का केले, याचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती नाैपाडा पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद कुंभार यांनी दिली.

Web Title: The driver who jumped from the bridge while under the influence of alcohol was seriously injured

टॅग्स :thaneठाणे