दुकानासमोर आलेल्या कुत्र्यांना लोखंडी सळई टोचून केलं जखमी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: July 16, 2024 20:39 IST2024-07-16T20:38:11+5:302024-07-16T20:39:38+5:30
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार

दुकानासमोर आलेल्या कुत्र्यांना लोखंडी सळई टोचून केलं जखमी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर: चिकनच्या दुकानासमोर आलेल्या कुत्र्यांना अब्दुल हसन मुल्ला याने लोखंडी सळईने व टोकदार टोच्याने टोचून जखमी केल्याची घटना सम्राट अशोकनगर मध्ये सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी तक्रार देताच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३, सम्राट अशोकनगर मध्ये राहणारे अब्दुल हसन शेख याचे चिकनसेंटर नावाचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान दुकानासमोर भटके कुत्रे आल्याच्या रागातून मुल्ला याने लोखंडी सळई व टोकदार टोच्याने कुत्र्यांना टोचून जखमी केले. मुख्या निरपराध कुत्र्यांना जखमी केल्या प्रकरणी प्राणिप्रेमी मनोज गौर यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे अब्दुल मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करीत आहे.