शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांना अटक करणाऱ्या उपायुक्तांची झाली बदली, डॉ. विनयकुमार राठोड यांना बक्षिसी मिळाल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 12:49 IST

Police Transfer : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करून शुक्रवारची रात्र पोलिस कोठडीत ठेवण्याच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका असणारे झोन ५ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची शनिवारी अचानक वाहतूक शाखेत बदली करण्यात आली.

ठाणे  : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करून शुक्रवारची रात्र पोलिस कोठडीत ठेवण्याच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका असणारे झोन ५ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची शनिवारी अचानक वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. वाहतूक विभागातील बदली ही राठोड यांना मिळालेली बक्षिसी असल्याचा आरोप खुद्द आव्हाड यांनी केला आहे, तर राठोड यांच्यासह दहा उपायुक्तांच्या बदल्या झाल्याने ही नियमित बदली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.आव्हाड यांना पोलिस ठाण्यात शुक्रवारी हजर राहण्यास सांगितल्यानंतर थोड्याच वेळात राठोड तेथे दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. आव्हाड यांना वैद्यकीय तपासणीस नेताना पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. ही सर्व परिस्थिती राठोड यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी शुक्रवारी हाताळली. शुक्रवारी जामीन मिळू नये याकरिता पोलिसांवर दबाव असल्याचे आव्हाड यांचे म्हणणे होते. आव्हाड यांना शनिवारी जामीन मंजूर होताच राठोड यांची वाहतूक विभागाच्या दीर्घकाळ रिक्त असलेल्या उपायुक्तपदावर बदली झाल्याचे वृत्त आले.

दहा उपायुक्तांच्या बदल्या ही नियमित बदली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. राठोड यांना झोन ५ मध्ये दोन वर्षे पूर्ण झाली होती. तसेच वाहतूक विभागाचे उपायुक्तपद मागील सहा महिने रिक्त होते. त्यामुळे त्या जागी त्यांची बदली करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूक विभाग हा पोलिस आयुक्तालयाचा भाग असल्यामुळे राठोड यांना बक्षिसी मिळाल्याची चर्चा सुरू आहे. राठोड यांच्यासोबत दहा उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड