खाडीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
By जितेंद्र कालेकर | Updated: July 31, 2024 20:35 IST2024-07-31T20:35:23+5:302024-07-31T20:35:37+5:30
कळवा रेतीबंदर भागातील घटना.

खाडीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळव्यातील रेतीबंदर गणपती विसर्जन घाटाजवळ खाडीत सुमारे ३५ ते ४० वर्षे असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी दुपारी ३.१८ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह खाडीतून बाहेर काढला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी बुधवारी दिली.
हा मृतदेह कळवा रेतीबंदर खाडी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कळवा पोलिसांचे पथक , आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडीतील मृतदेह बाहेर काढून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिला. पुढील कार्यवाहीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला आहे. त्याची ओळख पटविण्यात येत असून त्याच्या नातेवाईकांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.