शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पदपथावर थाटले कार्यालय, कर्मचारी, ग्राहकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:24 IST

टिटवाळा शहरातील महावितरणच्या शाखा कार्यालयास हक्काची जागा नाही.

- उमेश जाधवटिटवाळा : शहरातील महावितरणच्या शाखा कार्यालयास हक्काची जागा नाही. त्यामुळे विद्युत उपअभियंता व १७ कर्मचाऱ्यांवर दोन महिन्यांपासून गणेशनगर सोसायटी रोड येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर पदपथावर टेबल टाकून ग्राहकांच्या समस्या सोडवण्याची आणि कार्यालयीन कामकाज करण्याची वेळ आली आहे. ४५ हजारांहून अधिक ग्राहकसंख्या आणि लाखो रुपयांचे उत्पन्न असतानाही महावितरणवर ही वेळ का आली, असा प्रश्न विचारलाजात आहे.महावितरणचे शहरातील शाखा कार्यालय कित्येक वर्षांपासून गणेश मंदिर रोडलगत डीएनएस बँक परिसरात होते. हे कार्यालय भाड्याच्या जागेत होते. भंगार, कचरा यामुळे तेथे घाणीचे व डासांचे साम्राज्य होते. अनेकदा तेथे विंचू आणि सापही निघाले होते. महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करताना ग्राहकांनी हे कार्यालय लक्ष्य केले होते. त्यावेळी त्याची तोडफोडही करण्यात आली. त्यानंतर, हे कार्यालय रवींद्र आर्केडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले होते. मात्र, त्याच्या भाडेकराराची मुदत संपल्याने तेही महावितरणला सोडावे लागले.दुसरीकडे कल्याणमध्ये असलेले उपकार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय टिटवाळ्यात स्थलांतरित करण्यात आले. हे कार्यालय गणपती मंदिर रोडवरील गणेशनगर सोसायटी रोडकडे सुरू केले आहे. याच कार्यालयाबाहेरील पदपथावर टिटवाळा शाखा कार्यालय थाटले आहे. त्यामुळे अवाजवी बिलांच्या तक्रारी, नवीन मीटर बसवणे, वीजबिल भरणा करणे आदी कामांसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही भर उन्हात उभे राहावे लागत आहे. उन्हाळा वाढू लागल्याने कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे नवीन कार्यालय कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत सर्व कर्मचारी आहेत. कार्यालयाच्या शोध सुरू असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.महावितरणला टिटवाळा शहरातून वीजबिलापोटी मासिक दोन कोटींवर महसूल मिळत आहे. तरीही, त्यांना टिटवाळा शहराला शाखा कार्यालय देता येत नाही. पदपथावर शाखा कार्यालय थाटले आहे, हे योग्य नाही.- अशोक डोंगरे, ग्राहक, टिटवाळाउन्हातान्हात आम्हाला आमच्या तक्र ारी देण्यासाठी रस्त्यावर उभे राहावे लागते. ग्राहकांची किती मोठी गैरसोय होते, याकडे महावितरण कंपनी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.-प्रभावती पाटील, ग्राहक, टिटवाळाआम्ही कार्यालयाच्या शोधात आहोत. आवश्यक असलेली जागा मिळत नाही. लवकरच शाखा कार्यालयास जागा उपलब्ध करून देण्यात येईल.- धीरजकुमार धुवे, उपकार्यकारी अभियंता

टॅग्स :mahavitaranमहावितरण