शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी-टेम्पोमध्ये थाटला संसार; रात्र काढली जागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:11 IST

गोविंदवाडी बायपास परिसरातील नागरिकांचा पुलावर मुक्काम

- मुरलीधर भवारकल्याण : पावसाच्या पुरामुळे कल्याण खाडीचे पाणी जसे वाढू लागले, तसे आम्ही सगळे अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडलो. गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील ओळखीच्या व्यक्तीच्या टॅक्सीमध्ये २४ तास जागून काढले आहेत. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून कोणीही मदतीसाठी आले नाही. साधी विचारपूसही केली नाही, अशी व्यथा दुर्गाडी खाडी परिसरातील घरात राहणारे मेहमूद शेख यांनी मांडली.मुसळधार पावसामुळे कल्याण खाडीने रौद्ररूप धारण केल्याने रविवारी पहाटे ५ वाजता शेख यांच्या घरात पुराचे पाणी शिरू लागले. तेव्हा ते, पत्नी अमिना, मुलगा वकास यांच्यासह गॅस सिलिंडर घेऊन घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी थेट गोविंदवाडी बायपास रस्ता गाठला. तेथे मित्र मुनाफ शेख याची टॅक्सी उभी होती. त्या टॅक्सीमध्ये त्यांनी पूर्ण रात्र जागून काढली. साधी विचारपूस करायलाही महापालिकेकडून कोणीही आले नाही. काही संस्थांनी त्यांना बिस्किटे व चहा दिला. त्यावर, त्यांनी रात्र काढली.खाडी परिसरातील सुमित्रा काऊतकर यांच्याही घरात पाणी शिरल्याने त्यांनी एका टेम्पोत संसार थाटला. गोविंदवाडी बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोत त्यांनी घरातील मोजकेच साहित्य घेऊन रात्र काढली. पती भगवान, मुलगा आनंद, अमोल आणि प्रिया हेदेखील त्यांच्या सोबत होते. घरकाम करणाऱ्या अरुणा मोरे यांचाही संसार एका टेम्पोतच आहे. घरातील सगळे सामान सोडून त्यांनी टेम्पोचा आधार घेतला. तसेच मोरे यांच्या टेम्पोतच आसिया युसूफ शेख यांनीही जागून रात्र काढली.७० वर्षीय हुसेन इस्माईल यांची खाडीकिनारी असलेली चहाची टपरी वाहून गेली आहे. रहिवासी नासीर शेख यांनी सांगितले की, महापालिकेने पूरग्रस्तांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या टॅक्सी-टेम्पोचालकांनी त्यांच्या गाड्या बाधितांना राहण्यासाठी दिल्या आहेत. बाधित झालेल्या जवळपास १५० कुटुंबांनी टॅक्सी-टेम्पोचा आधार घेतला. त्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे.म्हशींचा गोठाही रस्त्यावरचकल्याण खाडी परिसरालगत १५० पेक्षा जास्त गोठे असून, त्यात जवळपास पाच हजार म्हशी आहेत. म्हशींना पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी अनेक गोठामालकांनी त्यांच्या म्हशी गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या दुभाजकाला बांधल्या. दुभाजकाच्या मधोमध त्यांच्यासाठी चारा टाकण्यात आला होता. म्हशीच्या शेणगोठ्यामुळे रस्त्यावर सगळा राळ पसरला आहे.वाहतूक सुरू : पुरामुळे दुर्गाडी चौकात रविवारी पाणी भरल्याने दुर्गाडी पुलावरून कल्याण-भिवंडी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ही वाहतूक सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यांची चाळण तसेच बारीक खडी पसरल्याने रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. वाहतूककोंडीचा सामना करीत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊस