शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांची कारवाई: मोबाईलसह अमेरिकन डॉलरची चोरी करणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 21:39 IST

परेदशात गेलेली महिला ठाण्यात परतल्यानंतर तिच्याकडून अनावधानाने घराबाहेरच तिची पर्स राहिली. या पर्समधील तीन मोबाईलसह अमेरिकन डॉलर्सची चोरी करणा-यास वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देएक आठवडयापूर्वी झाली होती चोरीसीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केला तपासआरोपीकडून मोबाईलसह कॅमेरा हस्तगत

ठाणे : तीन मोबाईलसह ५०० अमेरिकन डॉलर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरणा-या हिमांशू घोसाळकर (१९, दोस्ती एमएमआरडी, ठाणे) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.वर्तकनगरच्या ‘दोस्ती कॉम्पलेक्स’ या इमारतीच्या १६ व्या मजल्यावर राहणाºया नंदा रामा राव (५८) या २० फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दुबई येथून ठाण्यातील घरी परतल्या. त्या घरी आल्यानंतर घराच्या बाहेर असलेल्या बूट स्टँडवर त्यांनी आपली पर्स ठेवून दरवाजा उघडला. याच पर्समध्ये १८ हजारांची रोकड, ५०० अमेरिकन डॉलर (३२ हजार ४०० रुपयांचे भारतीय चलन), तीन मोबाईल असा ६६ हजार ४०० रुपयांचा ऐवजही होता. घाईगडबडीत त्यांच्याकडून हा सर्व ऐवज असलेली पर्स घराबाहेरच राहिली. सकाळी ७ वाजता जाग आल्यानंतर त्यांनी फोन करण्यासाठी मोबाईलची शोधा शोध केली. तेंव्हा त्यांना त्यांचा एकही मोबाईल आणि पर्स मिळाली नाही. त्याचवेळी पर्स घराबाहेर विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, घराबाहेरही शोधाशोध केल्यानंतरही त्यांना ती न मिळाल्याने त्यांनी अखेर याप्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्रेहल अडसुळे, हवालदार विनायक आंबेकर आणि कॉन्स्टेबल महेश राऊत यांच्या पथकाने नंदा यांच्या इमारतीमध्ये २० फेब्रुवारी रोजी पहाटे २ ते सकाळी ७ या दरम्यान कोण कोण आले? याची तपासणी केली. त्यावेळी पेपर विक्रेता हिमांशू यांच्यासह अन्य काही जण आल्याचे सीसीटीव्हीचे फुटेजही मिळाले. त्यात हिमांशूच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्याची खास शैलीत या पथकाने चौकशी केली. याच चौकशीत त्याने या चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून तीन मोबाईल आणि एक कॅमेरा हस्तगत केला असून रोकड मात्र त्याने दिली नाही. हीच रोकड हस्तगत करण्यासाठी न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाtheftचोरी