शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील एमडी तस्करी प्रकरण: आरोपीला आता नाशिक पोलीस करणार अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:08 IST

ठाण्यातून एमडी पावडरची तस्करी करणा-या अक्रम खान याच्याविरुद्ध नाशिकमध्येही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. यात त्याला नाशिक पोलीस ठाणे कारागृहातून ताब्यात घेणार आहेत.

ठळक मुद्दे भोलाच्या शोधासाठी ठाणे पोलीस दुस-यांदा मध्यप्रदेशातआणखीही धागेदोरे मिळण्याची शक्यताआतापर्यंत तिघांना अटक

ठाणे : ठाण्याच्या नितिन कंपनीजवळ एमडी (मेफेड्रॉन) पावडरच्या तस्करीप्रकरणी पकडलेल्या अक्रम असलम खान याच्यावर नाशिकमध्ये मोक्कांतर्गत कारवाई होणार आहे. त्याच कारवाईसाठी नाशिकच्या मुंबईनाका पोलीस ठाण्याचे पथक त्याला लवकरच ठाणे न्यायालयामार्फत ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातून नाशिकमध्ये १६ लाख ४४ हजारांची ८२२ ग्रॅम एमडी पावडरची तस्करी करतांना अक्रमला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार आदींच्या पथकाने ३ जानेवारी रोजी अटक केली होती. या प्रकरणात त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. सोमवारी तिची मुदत संपल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अक्रमने रईस शेख आणि अजय जाधवन यांच्याकडून एमडी पावडरची खरेदी केल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांनाही ठाणे पोलिसांनी ६ जानेवारी रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथून अटक केली. त्यांनी ही पावडर मध्यप्रदेशातील भोला या एमडी विक्रेत्याकडून आणल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी मध्यप्रदेशात गेले होते. मात्र तो हाती लागला नाही. दरम्यान, अक्रमविरुद्ध नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून मुंबईनाका पोलीस ठाण्यातही त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. मात्र तो यात फरार आहे. आता याच कारवाईसाठी त्याचा ठाणे न्यायालयामार्फत नाशिक पोलीस ताबा घेणार आहेत. तर भोलाचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलीस पुन्हा मध्यप्रदेशात रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला अटक केल्यानंतर एमडी प्रकरणातील आणखी धागेदारे हाती लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसPoliceपोलिसCrimeगुन्हा