शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या डायघर पोलिसांनी एकाच वेळी दाखविले माणूसकी आणि कारवाईचे दर्शन

By जितेंद्र कालेकर | Updated: April 2, 2020 19:16 IST

मंगळवारी गस्तीच्या दरम्यान डायघर पोलिसांच्या व्हॅनचा सायरन वाजल्यानंतर एका फळ विक्रेत्याने घाबरुन पळ काढला. त्याच्या फळांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्वत: त्याची गाडी ढकलून चौकीवर आणली. त्यानंतर कोरोनाची माहिती देऊन तोंडाला लावण्यासाठी मास्क आणि त्याची हातगाडीही परत केली.

ठळक मुद्देपोलीस आल्याचे समजताच फळ विक्रेता पळालावरिष्ठ पोलीस निरीक्षकाने स्वत: ढकलत आणली हातगाडीवाहन चालकांविरुद्ध दाखल केले गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदीच्या काळात नागरिकांना हटवितांना पोलिसांना माणूसकीचे भानही ठेवावे लागत आहे. मंगळवारी गस्तीच्या दरम्यान डायघर पोलिसांच्या व्हॅनचा सायरन वाजल्यानंतर एका फळ विक्रेत्याने घाबरुन पळ काढला. त्याच्या फळांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्वत: त्याची गाडी ढकलून चौकीवर आणली. दरम्यान, विनाकारण रस्त्यावर आलेल्या पाच वाहन चालकांविरुद्ध मात्र बुधवारी त्यांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले.शीळफाटा ते पूजा पंजाब हॉटेल महापे रोडवर पोलीस व्हॅनचा सायरन वाजवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांची ३१ मार्च रोजी गस्त सुरु होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना घरात राहण्याबाबतच्या सूचना त्यांच्याकडून ध्वनीक्षेपकाद्वारे दिल्या जात होत्या. पोलिसांची व्हॅन पाहूनच गर्भगळीत झालेल्या एका फळ विक्रेत्याने मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असतांनाही आपला ठेला सोडून तिथून पळ काढला. आपला ठेला घेण्यासाठी तो परत येईल, या अपेक्षेने जाधव यांनी काही वेळ तिथे थांबून त्याची वाट पाहिली. मात्र भीतीने तो आलाच नाही. त्याचे ठेल्यावरील फळ कोणी चोरू नये यासाठी स्वत: जाधव यांनी तो ठेला ढकलत शीळ फाटा पोलीस चौकी येथे नेऊन ठेवला. काही तासांनी हा फळ विक्रेता तरुण घाबरतच या चौकीत येऊन त्यांना भेटला. तेंव्हा त्यास कोरोना विषाणूची माहिती देऊन तोंडावर लावण्यासाठी एक मास्कही देऊन त्याचा ठेला त्यांनी त्याला परत केला. दरम्यान, विनाकारण वाहने रस्त्यावर आणणाºया आरीस खान (२१, डावले, ठाणे), विजय सिंग (२१, रा. डोंबिवली), संदीप रजक (३०, रा. कुर्ला, मुंबई), किशोर आलीमकर (४०, रा. शीळगाव, ठाणे), बालेंद्र मिश्रा (५५, दिघा, नवी मुंबई) आणि दिनेश गुप्ता (३१, रा. दिवा, ठाणे)या वाहन चालकांविरुद्ध १ एप्रिल रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग उपाययोजना कायद्यासह कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी डायघर पोलिसांनी काही दानशूर नागरिकांच्या मदतीने सुमारे ६० मजूरांच्या घरातही आवश्यक वस्तूंचे वाटप केले होते. विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध मात्र कारवाई करण्यात कोणाचीही गय केली जात नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस