शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ठाणेकरांचा १५,६८६ किलो द्राक्षांवर ताव, शेतकऱ्यांना रोख रकमेचा लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 23:37 IST

Thane : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत श्रीसंत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानअंतर्गत ठाणे शहरात ठिकठिकाणी आठवडी बाजार सुरू आहे.

ठाणे: शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात नुकताच चार दिवस द्राक्षे महोत्सव पार पडला. या महोत्सवात १५ हजार ६८६ किलो ताज्या द्राक्षांसह उत्तम दर्जाचा कांदा, बटाटा आणि रंगीबेरंगी कोबीची खरेदी चोखंदळ ठाणेकर ग्राहकांनी केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना रोख रकमेचा लाभ झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत श्रीसंत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानअंतर्गत ठाणे शहरात ठिकठिकाणी आठवडी बाजार सुरू आहे. गेल्या चार दिवसांत द्राक्षे महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी ताजी रसाळ द्राक्षे, कांदा, भाजीपाल्यासह बटाटे, कोबी आदींची ठाणेकरांना स्वस्तात विक्री केली.   बाजारात १५० ते १६० रुपये किलो मिळणारी द्राक्षे या महोत्सवात अवघ्या १२५ ते १३० रुपये दराने ठाणेकरांनी खरेदी केली आहेत. यामध्ये काळ्या द्राक्षाच्या वाणासह सोनाका, फामी, नानासाहेब परपळ आदी द्राक्षांचे वाण खरेदी करता केले. ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या या द्राक्षे महोत्सवात हिरवा व काळ्या रंगाची पाच हजार किलो द्राक्षांची विक्री झाली आहे. याशिवाय २०५०  किलो फामी द्राक्षांची खरेदीही ठाणेकरांनी केली आहे.  एवढेच नव्हे तर २५०  ते ३०० रुपये किलो असणारा बेदाणा या महोत्सवात ठाणेकरांना २०० ते २२५च्या दराने खरेदी करता आला.या महोत्सवात चार हजार ८०० किलाे द्राक्षे विकण्याचे उद्दिष्ठ असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल  सात हजार किलाे द्राक्षांची विक्री या आठवडे बाजारात करणे शक्य झाले आहे. ठाणोकरांच्या या प्रतिसादास अनुसरून नाशिकच्या द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या द्राक्षांच्या जोडीला ठाणेकरांनी वेगवेगळ्या रंगाच्या ९६८ किलो कोबीची खरेदी केली. याशिवाय सात हजार ५०० किलो कांदा, काकडी, वांगी, कोबी, भेंडी आणि टोमॅटोची ग्राहकांनी खरेदी करून शेतकऱ्यांच्या हाती एकरकमी मोबदला दिला आहे.

भाजीपाला, फळफळावळ विकणारे अन्य राज्यांतील बहुतांश व्यापारी, किरकोळ विक्रेते अजून ठाणेसह मुंबई शहरात दाखल झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा ग्राहक या आठवडी बाजाराच्या माध्यमातून सध्या सहज मिळवता येत आहे. या ग्राहकांची ओढ कायम ठेवण्यासाठी व व्यापाऱ्यांचा अडथळा न ठेवता शेतकऱ्यांना त्याच्या मालाची विक्री करण्यासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, बाजारपेठाजवळची मैदाने, शासकीय कार्यालयाच्या आवारात द्राक्षांसह ताज्या भाजीपाल्याची विक्रीला संधी देणे अपेक्षित आहे.- प्रकाश महाले, पिंपळगाव बसवंत, नाशिक 

टॅग्स :thaneठाणे