लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: हौसेला मोल नसते. असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना रविवारी अनुभवायला आला. निमित्त होते विंटेज कार रॅलीचे. चर्चगेट ते ठाणे आणि ठाणे शहरातील काही मार्गांवरुन या सुमारे १०० वर्षे जुन्या मोटारगाडया धावताना पाहून अनेकांच्या डोळयांचे पारणे फिटले.विंटेज अॅन्ड क्लासिक कार फेडरेशन आॅफ इंडिया, वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाईल असोसिएशन, फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल व्हेईकल अॅन्सिनस, रेमंड तसेच ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या विंटेज कार रॅलीची सुरुवात मुंबईतील चर्चगेट येथून सकाळी १०.३० वाजता झाली. ठाणे शहरात आनंदनगर चेकनाका येथून सकाळी ११.३० वाजता रॅलीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह रेमंडचे मालक गौतम सिंघानिया, विवेक गोएंका, विंटेज कारचे संग्राहक अनिल भिंगार्डे, नितीन ढोसा आदींचा या रॅलीमध्ये विशेष सहभाग होता. ठाण्यातील रस्त्यांवरुन मार्गक्रमण करणाºया या मोटारगाड्यांसाठी हौशींसह अनेकांनी त्या पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. यामध्ये १८८६ ते अगदी १९८९ पर्यंतच्या ४० मोटारकार आणि २७ मोटारसायकल तसेच स्कूटर आणि त्यांच्या संग्रहकांचा सहभाग होता. गौतम सिंघानिया यांच्याकडे १९३७ ची हडसन आणि १९३८ ची ब्यूक फॅदम तसेच रॉनी व्हेसूना यांची १९५७ ची फियाट ११००, नितीन ढोसा यांची एल्विस, विवेक गोएंका यांची १९३६ ची फोर्ड, यश रुईया यांची १८९६ ची मर्सिडीज बेंझ आणि १८८६ च्या कार पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती. याशिवाय, दुस-या महायुद्धातील १९४५ ची डिलीमा यांची मिलिटरी बीएसए तसेच १९५८ च्या लॅम्ब्रेटाचे मालक भिंगार्डे यांच्यासह वेगवेगळे दुचाकीस्वार यामध्ये सहभागी झाले होते.* असा होता ठाण्यातील मार्ग
‘‘कोणत्याही कार अथवा दुचाकी चालकाने सुरक्षितरित्या वाहन चालवावे. आपल्यामुळे दुसºयाला इजा, त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने आपला आणि दुस-याचाही जीव सांभाळावा, हा संदेश देण्यासाठी या विंटेज कार रॅलीचे आयोजन होते. ’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर