शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील विज्ञान प्रदर्शनात ठाणेकर विद्यार्थी अव्वल

By admin | Updated: August 28, 2015 23:24 IST

चीनमध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनात ठाण्यातील आनंदीबाई केशव जोशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पांना विशेष पारितोषिक जाहीर झाले आहे.

ठाणे : चीनमध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनात ठाण्यातील आनंदीबाई केशव जोशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पांना विशेष पारितोषिक जाहीर झाले आहे. चीनतर्फे दरवर्षी एक विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. देशोदेशीचे विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी होतात. गेली ९ वर्षे आनंदीबाई केशव जोशी शाळा या प्रदर्शनात सहभागी होत असून या शाळेला प्रदर्शनात सलग ७ वर्षे पारितोषिक मिळाले होते. या शाळेच्या निहार बाम आणि पल्लव खांडेकर या दोन विद्यार्थ्यांनी ‘व्हर्टिकल सक्सेस वाइंड टर्बाइन’ आणि ‘पोर्टेबल मोबाइल चार्जर’ हे दोन प्रकल्प या सादर केले होते. अपारंपरिक ऊर्जेचा वापर ही सध्याची गरज असून या दोन विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या प्रकल्पातून मांडली होती. पवनऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी दोन उभे पंखे बनवले असून या पंख्यांमुळे वाया जाणाऱ्या वाऱ्याचाही उपयोग करून जास्तीतजास्त ऊर्जा निर्माण करता येते, असे त्यांनी यातून दाखवले. तर, भूकंप अथवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोबाइल चार्जिंग करणे, ही एक मोठी समस्या आहे. पण, त्यांनी तयार केलेल्या उपकरणांमुळे हाताने फिरवून ऊर्जा निर्माण होते आणि मोबाइल चार्ज होतो. साधारणत: मोबाइलच्या मॉडेलप्रमाणे एका मिनिटाला १ टक्का ते २५ टक्के मोबाइल चार्ज होतो, असे त्यांनी आपल्या प्रयोगातून मांडले होते. ऊर्वी गुप्ते आणि तनिष्का लाड या दोघींनी निसर्ग आणि विज्ञानाचा परस्पर संबंध मांडताना निसर्ग हा वैज्ञानिक शोधांचा प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले. सौरपॅनल सूर्याभिमुख ठेवले जातात. घड्याळात वापरलेली गिअर यंत्रणा आणि गिअर्सची चक्रक्रिया सूर्याच्या दिशेनुसार फिरते. त्यामुळे सौरपॅनलद्वारे जास्तीतजास्त सौरऊर्जा निर्माण करता येते. हे चक्र १८० कोनांत फिरत असल्यामुळे सूर्यापासून जास्त ऊर्जा मिळवता येते. याच ऊर्जेचे विद्युतऊर्जेत रूपांतर केले जाते. त्याचप्रमाणे सौरकुकरमधील अन्न शिजवण्यातही मदत होते, असे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य होते. या प्रकल्पांची चीनमधील प्रदर्शनात विशेष पारितोषिकासाठी निवड झाली आहे. शाळेने या प्रदर्शनात आठव्यांदा पारितोषिक मिळवले आहे. (प्रतिनिधी)